आसाम परिस्थिती पाहून पपॉन केली दिल्लीतील कॉन्सर्ट रद्द

आसाम परिस्थिती पाहून पपॉन केली दिल्लीतील कॉन्सर्ट रद्द

आसाम परिस्थिती पाहून पपॉन केली दिल्ली कॉन्सर्ट रद्द

प्रसिद्ध गायक अंगर्ग महंतानं म्हणजे पपॉनच्या चाहत्यांसाठी त्याने एक वाईट गोष्ट ट्विटर अकाऊंटवरून शेअर केली आहे. त्याने सांगितलं की, दिल्लीत उद्या होणारी कॉन्सर्ट रद्द केल्याची माहिती त्यानं चाहत्यांना दिली आहे. तो म्हणाला, ‘माझं घर असलेलं आसाम राज्य जळतं आहे, रडतं आहे आणि राज्यात कर्फ्यू आहे.’ अशा परिस्थिती तो चाहत्यांचं मनोरंजन करू शकणार नाही, असं त्याने सांगितलं आहे.

त्याने असं ट्विट केलं आहे की, ‘ज्याप्रकारे आसाम जळतं आहे ते पाहणं अत्यंत वेदनादायक आहे. मानवतेचे नुकसान होतं आहे. अनेक वर्षांपासून आसाममध्ये बेकायदेशीर पणे स्थलांतर केलं जातं आहे. त्यामुळे आसामवर एक प्रकारे भार आहे. आम्ही याला पात्र नाही. आसाम मधील संस्कृती आणि लोकांना समजून घेणं गरजेचं आहे. तसंच आम्हाचं योग्य ऐकणं गरजेचं आहे.’

‘प्रिय दिल्ली, मी उद्या इन्सप्रिफोशॉर येथील असलेली कॉन्सर्ट रद्द केली आहे. त्यामुळे मला माफ करा. माझं घर असलेलं राज्य जळतं आहे, रडत आहे आणि राज्यात कर्फ्यू देखील आहे. माझी मानसिक स्थितीत आपले मनोरंजन करण्यासाठी योग्य नाही आहे.’, असं पपॉन म्हणाला.

त्यानंतर पुढे असं लिहिलं, ‘मला माहिती आहे आपल्यावर अन्याय झाला आहे कारण तुम्ही खूप दिवसांपूर्वी कॉन्सर्टची तिकिटं खरेदी केली असावीत आणि खूप प्लॅन देखील केले असतील. मला खात्री आहे कॉन्सर्टचे आयोजक नक्कीच तुम्हाला मदत करतील. मी पुन्हा तुम्हाला नक्की भेटने. मला आशा आहे तुम्ही समजून घ्याल.’

पपॉनच्या या ट्विटवर बऱ्याच नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहे. एका नेटकऱ्यांने पापोन यांचे आभार मानले आहेत. कारण आसाम विषयी कोणी सेलिब्रिटी बोलतं नाही. त्यामुळे पपॉनला याविषयी बोललेले पाहून त्या नेटकऱ्याला आनंद झाला असल्याचे मत व्यक्त केलं आहे.


हेही वाचा – धोनी, युवराज नाही तर दीपिकाला आवडतो ‘हा’ क्रिकेटर


 

First Published on: December 12, 2019 9:25 PM
Exit mobile version