घरमनोरंजनधोनी, युवराज नाही तर दीपिकाला आवडतो 'हा' क्रिकेटर

धोनी, युवराज नाही तर दीपिकाला आवडतो ‘हा’ क्रिकेटर

Subscribe

यावेळी दीपिकाने जीवनातील खेळाचे महत्त्वसुद्धा विषद केले. दरम्यान लवकरच दीपिका छपाक आणि ८३ या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहे. 

बॉलीवूडची आघाडीची अभिनेत्री दीपिका पदुकोण हिचे लग्नापूर्वी अनेक भारतीय क्रिकेटर्स सोबत नाव जोडण्यात आले होते. पण दीपिकाने मागील वर्षी अभिनेता रणवीर सिंगसोबत लग्नगाठ बांधली. काही दिवसांपूर्वीच दीपिकाने तिला आवडणाऱ्या क्रिकेटपटूचे नाव सांगितले. राहुल द्रविड हा माझा आवडता क्रिकेटपटू असल्याचे तिने सांगितले. यावेळी दीपिकाने जीवनातील खेळाचे महत्त्वसुद्धा विषद केले. दरम्यान लवकरच दीपिका छपाक आणि ८३ या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहे.

काय म्हणाली दीपिका?

त्यांच्या क्रिकेटमधील कारकिर्दीमुळे राहुल द्रविड हे माझे आदर्श नाहीत. तर राहुल द्रविड यांनी स्वतःला ज्याप्रमाणे सांभाळले त्यामुळे ते माझे आदर्श आहेत. माझ्यासाठी राहुल हे असे व्यक्ती आहेत ज्यांची मी प्रशंसा करते एवढेच नाही तर ते बेंगळुरुचे स्थायिक आहेत. आणि म्हणूनच ते माझे आदर्श आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – ‘छपाक’पूर्वी ‘या’ चित्रपटातून उलगडली होती अॅसिडग्रस्त तरुणीची कथा

जीवनात खेळाला महत्त्व

जीवनातील खेळाचे महत्त्व सांगताना दीपिका म्हणाली की, “आपण आपली शारीरिक क्षमता आणि मानसिक सहनशक्तीसाठी काय करतो, या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. अनेकदा आपल्याला असे वाटते की आपलं शरीर आणि मेंदूमध्ये सामंजस्याची कमतरता आहे. अनेकदा आपला मेंदू आपल्यावर शीरजोरी करण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे त्याची काळजी घेणे गरजेचे बनते. एक तरुण खेळाडू या बाबींकडे लक्ष देतो. पण याबरोबरच त्यांना धैर्य, साहस, दृढनिश्चय या बाबींकडे देखील लक्ष देणं गरजेचं आहे.”

या चित्रपटांमध्ये दीपिकाच्या मुख्य भूमिका

दरम्यान दीपिकाच्या आगामी छपाक या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला. हा ट्रेलर पाहून अंगावर काटा उभा राहतो. अॅसिड हल्ल्यातील पीडिता लक्ष्मी अग्रवाल हिच्या आयुष्यावर आधारित या चित्रपटात दीपिका मालतीची भूमिका साकारत आहे. या चित्रपटाव्यतिरिक्त दीपिका पदुकोण रणवीर सिंगच्या ८३ या चित्रपटातसुद्धा दिसणार आहे. १९८३ मध्ये भारताने पहिल्यांदाच क्रिकेटचा विश्वचषक आपल्या नावावर केला होता. यावर आधारित हा चित्रपट असणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -