करिअर मध्ये यश मिळावं म्हणून Lock Upp मधील Payal Rohatgi करत होती वशीकरण

करिअर मध्ये यश मिळावं म्हणून Lock Upp मधील Payal Rohatgi करत होती वशीकरण

कंगना रनौतचा लॉकअप हा वादग्रस्त शो सध्या सर्वत्र चर्चेत आहे, आता हळूहळू यातील सहभागी सेलिब्रिटिंची वेगवेगळी रूपं प्रेक्षकांना पाहायला मिळत आहेत. सेलिब्रिटींचा असा अनोखा अवतार पाहून प्रेक्षकांची उत्सुकता वाढत आहे. सेलिब्रिटी आता एकापाठोपाठ एक मोठे खुलासे करत आहेत. आताच्या ताज्या एपिसोडमध्ये कंगनाची सर्वात वादग्रस्त कैदी पायल रोहतगीने तिच्या आयुष्यातील एक भयानक सत्य सगळ्यांनसमोर आनलेले आहे, जे सत्य ऐकल्यावर सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसलेला आहे.

ज्यामध्ये पायलने सांगितलं की, तिला तिच्या करिअरमध्ये मोठ्ठ यश मिळावं म्हणून ती वशीकरण म्हणजेच तांत्रिक पूजा करायची. पायल तिचं रहस्य सगळ्यांनसमोर आणत म्हणाली की, या इंडस्ट्रीमध्ये मी 15 पेक्षा जास्त वर्षापासून आहे, जेव्हा माझ्या आयुष्यातला कठीण काळ चालू होता. तेव्हा तिने करिअरच्या यशा करता तांत्रिक पूजेचा अवलंब केला होता.

पायल पुढे म्हणाली , मला नाही वाटत की, कोणतीही सुशिक्षित महिला किंवा पुरुष करिअर पुढे नेण्यासाठी असा विचार करू शकेल आणि जरी केला तरी त्यांना हे सगळ्यांपासून लपवून करावं लागतं.

पायल ने सांगितली , ते एक प्रकारचं वशीकरण होतं, जे मी केलं आहे. दिल्लीमध्ये एक पुजारी होता, तो मला म्हणाला की,अशा व्यक्तीचा विचार करा किंवा त्या व्यक्तीची अशी काही गोष्ट आणा, ज्यावर नियंत्रण ठेवाता येईल अशा प्रकारे मी अनेक गोष्टी केल्या परंतु मला त्याचा काहीच फायदा झाला नाही.

पायल पुढे म्हणाली – मला भीती वाटत होती की,जर मी कोणाला या बद्दल काही सांगितले किंवा माझ्या आईला सांगितले की मी माझे करिअर वाचवण्यासाठी वशीकरण केले, पण मला याचा काहीही फायदा झाला नाही. तर लोक माझी चेष्टा करतील. हे एक रहस्य आहे. मला नाही वाटत की, कोणताही सुशिक्षित व्यक्ती त्यांचे करिअर पुढे नेण्यासाठी हा मार्ग स्वीकारेल.

पायल रोहतगीच्या या खुलाशावर, लॉक अपची होस्ट कंगना रानौत हसून म्हणाली – मग तू जे केलेस ती काळी जादू होती. तुम्ही काळी जादू करून लोकांना वश करण्याचा प्रसत्न केला.

कंगना पुढे म्हणाली – पायल मला वाटत की, तुम्ही सुंदर आणि टॅलेंटेड आहात. तुम्हाला तांत्रिक पूजेची गरज नाही. तुम्ही लोकांना असं ही वश करू शकता. जेव्हा मी इंडस्ट्रीत आले तेव्हा मला मुलगी काळी जादू करते असेही म्हणण्यात आलं होतं. जेव्हा एखादी मुलगी यशस्वी होते तेव्हा लोक तिच्या क्षमतेवर शंका घेतात. परंतु तुम्ही ही गोष्ट सांगण्यास खूप हिंमत दाखवली आहे.

पायलने पुढे सांगितले की, तिच्या धर्मात हे सर्व करण्यास परवानगी आहे. यावर कंगनाने उत्तर दिले- तुम्ही ज्याला हिंदू धर्माचे राजदूत बनता त्याला थांबवा.आपल्या धर्मात असे काहीही नाही.


हेही वाचा :Vidya Balan चे चित्रपट OTT वर गेल्याने Bhumi Pednekar ला होणार फायदा

First Published on: March 29, 2022 3:59 AM
Exit mobile version