छायाचित्रकाराची कन्या बनली ‘अप्सरा’ ची स्पर्धक

छायाचित्रकाराची कन्या बनली ‘अप्सरा’ ची स्पर्धक

छायाचित्रकारची कन्या बनली 'अप्सरा' ची स्पर्धक

महाराष्ट्र लावणीची परंपरा जिवंत ठेवत, युवा पिढीला या पूर्वापार चालत आलेल्या लोकप्रिय नृत्याची ओळख करून देण्यासाठी झी युवा वाहिनीने ‘अप्सरा आली’ हा बहारदार लावणी नृत्याचा कार्यक्रम नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आणला आहे. लावणी म्हणजे गीत, नृत्य आणि अदाकारी यांचा त्रिवेणी संगम. महाराष्ट्राचं सुप्रसिद्ध लोकनृत्य ‘लावणी’ला मंच उपलब्ध करून देणाऱ्या अप्सरा आली या कार्यक्रमात बुधवार ते शुक्रवार प्रेक्षक महाराष्ट्रातील लावण्यवतींची अदाकारी अनुभत आहेत. यंदाच्या ‘अप्सरा आली’ या कार्यक्रमात मराठी सिनेसृष्टीतील सुप्रसिद्ध आणि अवॉर्ड विनिंग छायाचित्रकार संजय मेमाणे यांची कन्या पायल हिचे मृत्य पाहायला मिळणार आहे.

परदेशातून देखील लावण्यवतींचा समावेश

या कार्यक्रमात फक्त महाराष्ट्रच नव्हे तर चक्क परदेशातून देखील लावण्यवतींनी सहभाग घेतला आहे. त्यातील एक लावण्यवती म्हणजे पुण्याची पायल मेमाणे. पायल ही एक अत्यंत टॅलेंटेड लावणी नृत्यांगना असून ती अप्सरा आली कार्यक्रमातील इतर स्पर्धकांसाठी टफ कॉम्पिटिशन आहे. सर्व परीक्षक तिच्यावर कौतुकाचा वर्षाव करतात. तिची लावणी बघून परीक्षक सोनाली कुलकर्णी हिने तिला ‘तुझ्यासाठी प्रेक्षकांनी हा कार्यक्रम बघावा’ असं म्हणून कौतुकाची थाप देखील दिली. पायल ही मराठी सिनेसृष्टीतील सुप्रसिद्ध आणि अवॉर्ड विनिंग छायाचित्रकार संजय मेमाणे यांची कन्या आहे. कलेचा वारसा तिला तिच्या वडिलांकडून मिळाला असेल असं म्हणणं खोटं ठरणार नाही. वयाच्या १९व्या वर्षी पायलला हा मंच मिळाला असून ती या संधीचं पुरेपूर सोनं करेल आणि अप्सरा आलीची ट्रॉफी घरी घेऊन जाण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करेल यात शंकाच नाही.


वाचा – झी युवावर ‘अप्सरा आली’


 

First Published on: January 4, 2019 4:51 PM
Exit mobile version