घरमनोरंजनझी युवावर 'अप्सरा आली'

झी युवावर ‘अप्सरा आली’

Subscribe

माया जाधव, सुरेखा पुणेकर यांच्या निमित्ताने महाराष्ट्राची लावणी सातासमुद्रापलीकडे गेली असली तरी परदेशातल्या नागरिकांचा या कलेकडे फक्त मनोरंजन म्हणून पाहण्याचा दृष्टिकोन होता. अमेरिकेत स्थायिक असलेल्या मीना नेरूळकर यांच्या निमित्ताने ‘सुंदरा मनामध्ये भरली’ हा लावणीप्रधान कार्यक्रम मुंबईत दाखल झाला. भारतात या कार्यक्रमाला जी काही लोकप्रियता प्राप्त झाली त्यातून परदेशातल्या नृत्यांगणांना आपणही लावणी आत्मसात करावी ही इच्छा निर्माण झाली. झी युवावर बुधवार ते शुक्रवार रात्री 9.30 वाजता ‘अप्सरा आली’ हा लावणीला प्राधान्य देणारा रिअ‍ॅलिटी शो दाखवला जातो. त्यात क्लॉडिया आणि लिटा या दोन नृत्यांगणा कोलंबियातून यात सहभागी झालेल्या आहेत.

जगभर भारतीय शास्त्रीय नृत्याचे जबरदस्त आकर्षण आहे. पण अलीकडे लावणी शिकण्याचाही ओढा इथल्या महिलांमध्ये वाढलेला आहे. अर्चना जोगळेकर आपल्या परदेशी कलाकारांसह मुंबईत दाखल झाल्या होत्या, त्यावेळी त्यांनी शास्त्रीय नृत्याबरोबर लावणीची अदाही पेश केली होती. ‘अप्सरा आली’ मधे सहभागी झालेल्या नृत्यांगणांनी मोठ्या अडचणींवर मात करून, भारतात येऊन ही कला आत्मसात केली. इतकेच काय तर नृत्याचे क्लासेसही त्यांनी आपल्या शहरात सुरू केलेले आहेत. स्पर्धेच्या निमित्ताने आपल्याला बहारदार लावणी सादर करायला मिळणार याने या दोघी भारावलेल्या आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -