‘पीएम नरेंद्र मोदी’ बायोपिक प्रदर्शनाच्या तारखेत बदल

‘पीएम नरेंद्र मोदी’ बायोपिक प्रदर्शनाच्या तारखेत बदल

'पीएम नरेंद्र मोदी' बायोपिक प्रदर्शनाच्या तारखेत बदल

चित्रपटसृष्टीत आता राजकारणी नेत्यांच्या जीवनावर आधारित चित्रपट येत आहेत. या यादीत भर पडली आहे, ती ‘पीएम नरेंद्र मोदी’ या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाची. हा चित्रपट प्रदर्शित होण्या अगोदरच चर्चेचा विषय बनला आहे. दि. १७ रोजी ‘पीएम नरेंद्र मोदी’ या बायोपिकची तारीख जाहीर करण्यात आली होती, ही तारीख १२ एप्रिल होती. मात्र, या तारखेमध्ये बदल करण्यात आला आहे. १२ एप्रिल वरून आता ही तारीख ५ एप्रिल करण्यात आली आहे. ‘पीएम नरेंद्र मोदी’ या चित्रपटामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भूमिका अभिनेता विवेक ऑबेरॉय यांनी साकारली आहे. तसेच या चित्रटाचे दिग्दर्शन ओमंग कुमार यांनी केले आहे.

 

विवेकने केला खुलासा

दि. १८ रोजी या चित्रपटाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भूमिकेतील विवेकचे ९ वेगवेगळे लूक सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आले होते. आज दि. १९ रोजी पून्हा एकदा सोशल मीडियावरुन चित्रपटाची तारखेमध्ये बदल झाल्याचे विवेक ऑबेरॉय यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरून खुलासा केला आहे. विवेक या भूमिकेसाठी खूप मेहनत घेत आहे. या चित्रपटामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी याच्या जीवनातील वेगवेगळे टप्पे दाखवण्यात आले आहेत. नुकतेच त्यांच्या भूमिकेतील नऊ लूक प्रदर्शित झाले आहेत. विवेकला सात ते आठ तासांचा कालावधी हा त्याला मेकअपसाठी लागतो. सकाळी ८ वाजता बरोबर तो शूटिंगसाठी सेटवर हजर असतो. प्रोस्थेटिक मेकअपमुळे शुटिंग दरम्यान विवेकला काहीच खाता येत नाही. जे काही सेवन करायचे असते ते फक्त द्रव्यरुपातले खाणे विवेक खातो.

चित्रपटात या भूमिकेत

‘पीएम नरेंद्र मोदी’ या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बायोपिकमध्ये अमित शाह यांच्या भूमिकेत अभिनेता मनोज जोशी तर मोदींची आई हिराबेनच्या भूमिकेत जरीना वहाब दिसणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पत्नी जशोदाबेन यांची भूमिका अभिनेत्री बरखा बिष्ट सेनगुप्ता निभावणार आहेत.

First Published on: March 19, 2019 6:14 PM
Exit mobile version