पंतप्रधान मोदींनाही भावला ‘The Kashmir Files’ सिनेमा

पंतप्रधान मोदींनाही भावला ‘The Kashmir Files’ सिनेमा

'The Kashmir Files' सिनेमाची पंतप्रधान मोदींनी घेतली दखल

बॉलिवूडचा ‘द कश्मीर फाईल्स’ हा सिनेमा सध्या प्रेक्षकांची मनं जिंकत आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित या सिनेमातून काश्मिरच्या अत्यंत ज्वलंत विषयाच्या मांडणीने अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे. विशेष म्हणजे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देखील हा सिनेमा भावला आहे. नुकतीच द काश्मीर फाईल्स सिनेमाच्या टीमने पंतप्रधान मोदींची भेट घेतली होती. या भेटीदरम्यानचे अनेक फोटो दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री आणि निर्माते अभिषेक अग्रवाल यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले आहेत. या भेटीदरम्यान पंतप्रधान मोदींनी आपल्याला द काश्मीर फाईल्स हा सिनेमा आवडल्याचे म्हणत संपूर्ण टीमचे कौतुक केले आहे.

यावेळी मोदींनी काश्मिरी पंडितांच्या अनेक प्रश्नांवरही यावेळी चर्चा केली. यावेळी अभिनेत्री पल्लवी जोशी, निर्माते अभिषेक अग्रवाल उपस्थित होते. त्यांनी लिहिलं आहे की, मोदींनी आमच्या चित्रपटाचे कौतूक केले याबद्दल त्यांचे धन्यवाद. आम्ही जे काही तयार केले त्याची त्यांनी दखल घेतली यासाठी त्यांचे विशेष आभार.

काश्मिरी पंडितांवर झालेल्या अन्याय आणि अत्याचार हा विषय केंद्रस्थानी ठेवक सिनेमाची निर्मिती करण्यात आली आहे. ११ मार्चला संपूर्ण देशभरात हा सिनेमा रिलीज झाला. सोशल मीडियावर या सिनेमाविषयी विशेष चर्चा रंगली. या सिनेमात ब्रह्मा दत्तच्या भूमिकेत मिथुन चक्रवर्ती, पुष्करनाथच्या भूमिकेत अनुपम खेर, कृष्णा पंडितच्या भूमिकेत दर्शन कुमार, राधिका मेननच्या भूमिकेत पल्लवी जोशी, श्रद्धा पंडितच्या भूमिकेत भाषा सुंबली, फारूक मलिक हे कलाकार एकत्र झळकले आहेत. प्रदर्शनापासूनचं बॉक्स ऑफिसवर चित्रपटाने विक्रमी कमाई केली, प्रेक्षकांना हा चित्रपट कमालीचा आवडल्याचे दिसून आले आहे.


कुमकुम भाग्य फेम अभिनेत्री पूजा बॅनर्जीच्या घरी चिमुकलीचं आगमन


.

First Published on: March 13, 2022 1:29 PM
Exit mobile version