घरताज्या घडामोडीकुमकुम भाग्य फेम अभिनेत्री पूजा बॅनर्जीच्या घरी चिमुकलीचं आगमन

कुमकुम भाग्य फेम अभिनेत्री पूजा बॅनर्जीच्या घरी चिमुकलीचं आगमन

Subscribe

पूजा बॅनर्जीने प्रेंग्नसीमुळे काही महिन्यांपूर्वी कुमकुम भाग्य ही मालिका सोडली होती.

कुमकुम भाग्य या लोकप्रिय मालिकेत रिया मेहराची भूमिका साकारणारी अभिनेत्री पूजा बॅनर्जी आई झाली असून तिने शनिवारी सकाळी एका गोंडस चिमुकलीला जन्म दिलाय. पूजाचा भाऊ नील बॅनर्जीने टाइम्स ऑफ इंडियाला याबाबत माहिती दिली. तो म्हणाला,पूजा आता हॉस्पिटलमध्ये अँडमिट आहे. आम्ही सगळे नागपूर असून आमच्या कुटुंबात आलेल्या नव्या पाहुणीला पाहण्यासाठी आतूर झालो आहोत. कुटुंबातील सर्वजण सध्या सेलिब्रेशनच्या मूडमध्ये आहेत. मुलीचे बाबा आणि आजी हॉस्पिटलला गेले आहेत. आमच्या बाळाला पाहण्यासाठी आम्ही आणखी वाट पाहू शकत नाही आम्ही लवकरच तिला भेटणार आहोत.

पूजा बॅनर्जीने प्रेंग्नसीमुळे काही महिन्यांपूर्वी कुमकुम भाग्य ही मालिका सोडली होती. पूजा बॅनर्जीने एका मुलाखतीत प्रेग्नंसीच्या काळात कशाप्रकारे स्वत:ची काळजी घेतेय याविषयी सांगितले होते, पूजा म्हणाली होती मी हेल्थी डाएट फॉलो करतेय, त्याचप्रमाणे प्रेग्नंसीच्या काळात काय खावे याविषयी तिने सल्ला देखील दिला होता.

- Advertisement -

पूजाने म्हटले होते, मी सकाळी साडे सहा वाजता उठते आणि वॉकला जाते. मी दररोज हेल्दी फूड फॉलो करते. दिवसभर मी हे ठरवते की पुढच्या दिवशी मी काय खाऊ जेणेकरुन मला आणि बाळाला हेल्दी प्रोटीन्स मिळतील. तर संध्याकाळी मी पिझ्झा, वडापाव, शेवपुरी खायला नक्की जाते कारण काहीतरी अनहेल्दी खाल्ल्याशिवाय मन भरत नाही.

- Advertisement -

पुढे पुजा म्हणाली, डिलिव्हरी नंतर मी बाळाला घेऊन दिल्लीला तिच्या फॅमिलीसोबत शिफ्ट होणार आहे. तुमची आपली माणसं तुमच्या आणि बाळाच्या आजूबाजूला असणे बाळासाठी चांगले असते. मोठ्यांचे आशिर्वाद सतत तुमच्यावर राहतात. मी न्यूक्लिअर फॅमिलीत लहानाची मोठी झाली आहे त्यामुळे मोठी फॅमिली तिथली मज्जा अनुभवण्यासाठी आतूर झाले आहे.


हेही वाचा – Photo : दीपिकाच्या लेटेस्ट फोटोशूटची इंटरनेटवर चर्चा ! पाहा अभिनेत्रीचे हॉट फोटो

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -