पूनम पांडे आली ना मराठीत

पूनम पांडे आली ना मराठीत

राखी सावंत नंतर वादग्रस्त आणि चर्चेत राहणारी कोणती अभिनेत्री असेल तर ती आहे पूनम पांडे. हिंदी, भोजपुरी चित्रपटात आयटम डान्सर म्हणून तिची लोकप्रियता आहे. बिनधास्त, बेधडक असे तिचे वागणे आहे. अंगप्रदर्शन करायला ती कचरत नाही. दक्षिणेकडील कन्नड, तेलगू चित्रपटांनी तिच्या या बिनधास्तवृत्तीचा पुरेपूर फायदा घेतलेला आहे. ही पूनम जेव्हा चर्चेत नसते तेव्हा ती दक्षिणेकडील चित्रपटात काम करत आहे असा त्याचा अर्थ लावला जातो. मध्यंतरी क्रिकेटचे जे सामने झाले त्यावेळी तिने अंगप्रदर्शनाचे बिनधास्त विधान करून क्रीडा शौकीनांबरोबर सिने रसिकांचे लक्ष वेधून घेतले होते. हिंदीत आयटम नृत्यासाठी ज्या नर्तिका फेमस आहेत, त्या बर्‍याच अभिनेत्रींना मराठी चित्रपटात या निमित्ताने आणले होते. पूनम पांडे तेवढी राहिली होती, ती ‘भेद’ या चित्रपटाच्या निमित्ताने प्रथमच मराठी चित्रपटात दिसणार आहे. तिचे हे मादक पदार्पण पहाण्यासाठी १५ फेब्रुवारीची वाट पहावी लागेल.

‘भेद’ या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रमोद शिरभाते याने पूनमला तयार केलेले आहे. यात एकूण सहा गाणी आहेत. ‘कोण शिट्ट्या वाजवतो’ या गाण्यावर पूनम आपली अदा पेश करणार आहे. चित्रपटाची कथा जातीभेद आणि प्रेम यावर आधारलेली आहे. धर्म, संपत्ती, पैसा यात प्रेमाला किती स्थान दिले जाते, यात प्रेमी कसे भरकटले जातात हे दाखवण्याचा प्रयत्न यात होणार आहे. त्यासाठी दोन पिढ्यांतील दोन प्रेमप्रकरणे यात अधोरेखित केलेली आहेत. पुनर्जन्म हा या कथेचा मुख्य गाभा आहे. सुचिता जाचक यांनी ग्रीन चिली मुव्ही इंटरनॅशनलच्या वतीने या चित्रपटाची निर्मिती केलेली आहे. अजित गाडे, श्लेषा मिश्रा, अभिषेक चव्हाण, डॉ. राजेश बक्षी यांचा यात कलाकार म्हणून सहभाग आहे.

First Published on: February 1, 2019 5:37 AM
Exit mobile version