Lock Upp : पूनम पांडेने कंगनाच्या शोमध्ये दिलेले ‘हे’ वचन केले पूर्ण

Lock Upp : पूनम पांडेने कंगनाच्या शोमध्ये दिलेले ‘हे’ वचन केले पूर्ण

Lock Upp : पूनम पांडेने कंगनाच्या शोमध्ये दिलेले 'हे' वचन केले पूर्ण

अभिनेत्री कंगना राणौत होस्ट करत असलेला लॉक अप शो कोणत्या ना कोणत्या गोष्टींमुळे चर्चेत असतो. अलीकडे हा शो चर्चेत होता त्याचे कारण म्हणजे शोची सर्वात बोल्ड हसिना पूनम पांडे. पुनम पांडेने कंगनाच्या या शोमध्ये चाहत्यांना एक वचन दिले होते. हे वचन तिने आता पुर्ण केले आहे. कॅमेरासमोर टी-शर्ट काढण्याचे हे वचन होते. अखेर ते वचन पूर्ण करत तिने कॅमेऱ्यासमोर टी-शर्ट काढला आणि टॉपलेस झाली.

गेल्या आठवड्यात या शोमधून पुनम पांडे हिला नॉमिनेट करण्यात आले यावरून ती खूपच नाराज झाली होती. त्यानंतर तिने कॅमेऱ्यासमोर जाऊन आपल्या चाहत्यांना जास्तीत जास्त व्होट देऊन वाचवण्याची विनंती केली. तसेच नॉमिनेशनमध्ये जर ती वाचली तर तिने कॅमेऱ्यासमोर येऊन टी-शर्ट काढेल, असे वचन दिले.

जेव्हा निकालाचा दिवस आला तेव्हा शोची होस्ट कंगना राणौतने सांगितले की, पूनमला सर्वाधिक मते मिळाली आहेत त्यामुळे पूनम बाहेर पडण्यापासून बचावली आहे. पण पूनमे यासाठी दिलेले वचन पूर्ण करणार नाही, असे सर्वांना वाटत होते, पण तुरुंगात एकही कैदी नसताना तिने आपला टी-शर्ट काढत आपले वचन पूर्ण केलेय

यावेळी पूनम म्हणाली की, मी टॉपलेस होण्याचे माझे वचन पाळले आणि मी यापेक्षा जास्त काही करू शकत नाही, कारण हा शो सर्व वयोगटातील लोक पाहतात आणि मला असे काहीही करायचे नाही ज्यामुळे माझी प्रतिष्ठा आणि शोची प्रतिष्ठा खराब होईल.

एवढेच नाही तर मला दिलेले वचन पूर्ण करायचे असून मर्यादा ओलांडली नसल्याचेही तिने सांगितले. ती पुढे म्हणाली की, माझं टी-शर्ट काढण्याची जे वाट पाहत आहेत त्यांच्यासाठी मी सर्व काही करेन.


 

First Published on: April 6, 2022 9:57 AM
Exit mobile version