देवीचा जागर करत ‘कुलस्वामिनी’ चित्रपटाचं पोस्टर लाँच

देवीचा जागर करत  ‘कुलस्वामिनी’ चित्रपटाचं पोस्टर लाँच

अंबाबाईचा उदो उदो असं म्हणत नवरात्रोत्सवात सगळ्यांनीच देवीच्या नावाचा जयघोष केला. भक्तांच्या नवसाला पावणारी, संकट काळात धावून येणारी आणि दुष्टांचा संहार करणारी आणि सुख प्रदान करणारऱ्या देवीची स्तुती नेहमीची केली जाते. पण सृष्टीच्या कणाकणात वसलेलं देवीचं रूप आपल्याला कधी, कुठे आणि कोणत्या रुपात येऊन भेटेल, याची खरंतर कुणीच खात्री देऊ शकणार नाही. येत्या 11 नोव्हेंबरला हाच साक्षात्कार प्रेक्षकांना घडविण्यासाठी ‘कुलस्वामिनी’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

हे ही वाचा – सुष्मिता सेन ‘ताली’मध्ये साकारणार ट्रांसजेंडर गौरी सावंतची भूमिका

अल्ट्रा मीडिया अॅण्ड एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेडने एक दर्जेदार चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणला आहे. कंपनीचे सीईओ सुशीलकुमार अग्रवाल चित्रपटाचे निर्माते आहे. लघुपट, चित्रपट आणि ओटीटी प्लॅटफॉर्म्सवरील चित्रपटांचा अनुभव असलेले जोगेश्वर ढोबळे यांनी चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. देवीच्या अगाध लीलेचं यथार्थ दर्शन ‘कुलस्वामिनी’ चित्रपटातून प्रेक्षकांना होणार होणार असं पोस्टर पाहून कळतं. 5 ऑक्टोबर रोजी दसऱ्याच्या मुहूर्तावर चित्रपटाचं पोस्टर लाँच करण्यात आलं.

1942 साली प्रदर्शित झालेल्या ‘दौलत की जंग’ पासून या वर्षी प्रदर्शित झालेल्या ‘ढ लेकाचा’मधून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्री चित्रा देशमुख यांची या चित्रपटात प्रमुख भूमिका आहे. कपाळावर कुंकू लावलेल्या त्यांच्या फोटोच्या मागे साक्षात देवी फोटो पोस्टरमध्ये दिसत आहे. अर्थात, चित्रा देशमुख साकारत असलेलं पात्र आणि त्यांच्यावर असणारी देवीची कृपादृष्टी प्रेक्षकांना चित्रपटात पाहायला मिळणार आहे.

हे ही वाचा – ‘ए वतन मेरे वतन’ मध्ये मुख्य भूमिकेत दिसणार सारा अली खान आणि वरुण धवन

First Published on: October 7, 2022 11:53 AM
Exit mobile version