घरमनोरंजनसुष्मिता सेन 'ताली'मध्ये साकारणार ट्रांसजेंडर गौरी सावंतची भूमिका

सुष्मिता सेन ‘ताली’मध्ये साकारणार ट्रांसजेंडर गौरी सावंतची भूमिका

Subscribe

आर्या वेब सीरीजनंतर सुष्मिता पुन्हा एकदा ओटीटीवर धमाकेदार एन्ट्री करणार आहे. या वेब सीरीजचं नाव 'ताली' असून यामध्ये सुष्मिता ट्रांसजेंडर गौरी सावंतची भूमिका साकारणार आहे.

बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन मागील काही दिवसांपासून तिच्या खाजगी आयुष्यामुळे चर्चेत असते. सुष्मिताने अनेक वर्षांपासून स्वतःला बॉलिवूड चित्रपटांपासून लांब ठेवलं आहे. दरम्यान, आता बऱ्याच दिवासानंतर सुष्मिता सेन एका नव्या वेब सीरीज मध्ये झळकणार आहे. या वेब सीरीजचं नाव ‘ताली’ असून यामध्ये सुष्मिता एका ट्रांसजेंडरची भूमिका साकारणार आहे. या वेब सीरीजबाबत सांगत सुष्मिताने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. सुष्मिताची ही पोस्ट सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. या आधी सुष्मिता आर्या या वेब सीरीजमध्ये दिसली होती.

सुष्मिता साकारणार ट्रांसजेंडरची भूमिका
आर्या वेब सीरीजनंतर सुष्मिता पुन्हा एकदा ओटीटीवर धमाकेदार एन्ट्री करणार आहे. या वेब सीरीजचं नाव ‘ताली’ असून यामध्ये सुष्मिता ट्रांसजेंडर गौरी सावंतची भूमिका साकारणार आहे. या वेब सीरीजचा पोस्टर शेअर करत सुष्मिताने लिहिलंय की, ‘ताली बनवणार नाही, वाजवणार !’ यातील फोटोमध्ये सुष्मिताने साडी नेसली असून कपाळावर मोठी टिकली लावली आहे.

- Advertisement -

‘ताली’ची घोषणा करताच ट्रोल झाली सुष्मिता
सुष्मिता सेनच्या ताली वेब सीरीजची पोस्ट शेअर करताच चाहत्यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले. लोकांच्या मते “या वेब सीरीजसाठी त्यांनी खऱ्या ट्रांसजेंडरला का नाही कास्ट केलं?” आणि अनेक चाहते म्हणाले की, “आम्हाला वाटतं की आता
ट्रांसजेंडर महिलांनी काम करायची संधी द्यायला हवी”.

कोण आहे गौरी सावंत
गौरी सावंत एक ट्रांसजेंडर असून 2019 मध्ये भारतीय निवडणुक आयोगाने गौरी सावंतची महाराष्ट्राच्या 12 निवडणुक अॅम्बेसडरमधून नियुक्ती करण्यात आली. त्या LGBTQIA + समूहातील हे पद सांभाळणारी पहिली महिला झाल्या.

- Advertisement -

हेही वाचा :

विरोध करणाऱ्यांनी रावण कधी पाहिलाय का? असं म्हणत मनसेचा ‘आदिपुरुष’ चित्रपटाला पाठिंबा

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -