प्राचीचा बॉलिवूडमध्ये कमबॅक, या भूमिकेत दिसणार

प्राचीचा बॉलिवूडमध्ये कमबॅक, या भूमिकेत दिसणार

अभिनेत्री प्राची देसाईने केला नेपोटीजम बद्दल खुलासा म्हणाली ....

टेलिव्हिजनच्या ‘कसम से’ या मालिकेमधील आपल्या अभिनयाने लोकप्रियता मिळवलेली अभिनेत्री प्राची देसाई ने तिच्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. ‘रॉक ऑन’, वन्स अपॉन ए टाईम इन मुम्बई’ आणि ‘बोल बच्चन’ यांसारखे सुपरहिट सिनेमे प्राचीने केले आहेत. परंतु प्राची बॉलिवूडमध्ये फारसं यश मिळवू शकली नाही. गेल्या काही वर्षापासून ती बॉलिवूडपासून लांबच आहे. कोणत्याही चित्रपटात ती दिसली नाही आहे. यामुळे प्राचीचे चाहतेही तिच्या कमबॅकची वाट बघत होते. तिचे चाहते दरवेळी तिच्या कमबॅक विषयीच प्रश्न तिला विचारताना दिसायचे. अखेर प्राचीने तिच्या चाहत्यांची इच्छा पूर्ण केली आहे. लवकरच प्राची एक नवीन चित्रपट घेवून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्राची आता ‘सायलेन्स कॅन यू हियर इट’ या चित्रपटात झळकणार आहे. विशेष म्हणजे प्राचीच्या या आगामी चित्रपटात ती पहिल्यांदाच पोलिसाच्या भूमिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.


हे वाचा- सनी लिओनच्या गाडीच्या नंबरचा गैरवापर, मुंबईतून तरुणाला अटक

First Published on: February 25, 2021 5:54 PM
Exit mobile version