अभिनेता प्रणव पिंपळकरचा वैमानिक ते अभिनेता प्रवास सुरू

अभिनेता प्रणव पिंपळकरचा वैमानिक ते अभिनेता प्रवास सुरू

अभिनेता प्रणव पिंपळकरचा वैमानिक ते अभिनेता प्रवास सुरू

ध्येयपूर्तीचा ध्यास घेणारा प्रत्येक व्यक्ती हा आपल्या जीवनात उंच भरारी घेतो. जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर आपली आवड जोपासण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करतो आणि गगनभरारीचे स्वप्न पूर्ण करतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे अभिनेता प्रणव पिंपळकर. आकाशात भरारी घेण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी वैमानिक आणि आपली आवड पूर्ण करण्यासाठी अभिनय या दोन्ही बाजू उत्तम सांभाळत वैमानिक ते अभिनेता असा प्रवास प्रणवने गाठला आहे. वैमानिक असताना त्याला त्याच्या अंगी असलेली अभिनयाची आवड मात्र शांत बसू देत नव्हती आणि म्हणूनच त्याने अभिनयाच्या दिशेने वाटचाल सुरू केली. लवकरच प्रणव ‘साई कमल प्रॉडक्शन’ निर्मित ‘आलंय माझ्या राशीला’ या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे.


हेही वाचा – ‘तुझ्यात जीव रंगला’मध्ये ‘ही’ लावणी सम्राज्ञी दिसणार वहिनी साहेबांच्या भूमिकेत


 

First Published on: October 27, 2020 2:45 PM
Exit mobile version