पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितले दिवे लावण्यास, त्यावर सेलिब्रेटी म्हणतात…

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितले दिवे लावण्यास, त्यावर सेलिब्रेटी म्हणतात…

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितले दिवे लावण्यास, त्यावर सेलिब्रेटी म्हणतात...

जगात थैमान घालणाऱ्या कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात २१ दिवसांचा लॉकडाऊन जाहिर केला. त्यानंतर आज पुन्हा एकदा पंतप्रधानांनी देशाला संबोधले. यामध्ये ते म्हणाले की, ‘आपण सगळे एकच आहोत आणि ते दाखवण्यासाठी येत्या रविवारी ५ एप्रिल रोजी रात्री ९ वाजता तुमची ९ मिनिटे मला हवी आहेत. यावेळे तुम्ही घराच्या दरवाजात किंवा बाल्कनीमध्ये उभे राहून मेणबत्ती, दिवा, टॉर्च, मोबाईलचा फ्लॅश ९ मिनिटे लावा. तेव्हा घरातल्या लाईट बंद कराल, सगळीकडे जेव्हा प्रत्येकजण एकेक दिवा लावेल तेव्हा आपली महाशक्ती दिसून येईल. यातून दिसून येईल की आपण कुणीही एकटे नाहीत’, या आवाहनावर सोशल मीडियातून अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. विशेष म्हणजे बॉलिवूड सेलिब्रेटींनी देखील आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू, रंगोली चंदेल आणि चित्रपट दिग्दर्शक विवेक राजन अग्नीहोत्रीने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन ट्विट करत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनाला प्रतिक्रिया दिली आहे.

तापसी पन्नूने ट्विट करत म्हटले आहे की, ‘नया टास्क…

तर रंगोली चंदेलने लिहिले आहे, ‘दिवे लावणे एक चांगली गोष्ट असून एकमेकांना आपला सपोर्ट असल्याचे यातून दिसेल’.

विवेक राजन म्हणतात की, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एक बेस्ट लीडर’ आहेत.

तर प्रसून जोशी म्हणतात की, ‘आपल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्याला या कोरोनाच्या काळोखातून बाहेर पडण्यासाठी ९ मिनिटे मागितली आहेत. त्याप्रमाणे आपण हे केले पाहिजे आणि एकत्र येऊन अंधारातून उजेडाकडे पाहिले पाहिजे.


हेही वाचा – Coronavirus: टीका झाल्यानंतर आता शाहरूख खान करतोय भरघोस मदत!


 

First Published on: April 3, 2020 5:45 PM
Exit mobile version