प्रियांका चोप्राचे बॅालिवूड मध्ये पूर्णआगमन, २०२२ मध्ये चित्रपट येणार भेटीला

प्रियांका चोप्राचे बॅालिवूड मध्ये पूर्णआगमन, २०२२ मध्ये चित्रपट येणार भेटीला

प्रियांका चोप्राचे बॅालिवूड मध्ये पूर्णआगमन, २०२२ मध्ये चित्रपट येणार भेटीला

आपलया अभिनयाने प्रेक्षकांच्या मनाला भूल पाडणारि अभिनेत्री प्रियांका चोप्रा गेल्या काही दिवसांपासून बॅालिवूड पासून दूर आहे.अनेक चाहते तिच्या चित्रपटाची आतूरतेने वाट पाहत आहेत.
नुकतच प्रियांका ने ट्विटरवर प्रश्नोत्तरांच्या एक सेशन केलं होत.त्यात प्रियांका च्या अनेक चाहत्यांनी सहभाग घेतला होता.तसेच चाहत्यांच्या अनेक मजेशीर प्रश्नांना प्रियांकाने उत्तरे दिली.तेव्हा प्रियांका ने पुढील चित्रपट कधी भेटाला येणार याची घोषणा केली. तिने लिहले की ”सेट वर ब्रेक घेत आहे, कोण लवकरात लवकर प्रश्न विचारयला या” यानंतर चाहत्यांनी प्रियंकाला अनेक प्रश्न विचारले याचदरम्यान एका चाहत्याने प्रियांकाला तूझा पुढील बॅालिवूड चित्रपट केव्हा भेटीला येणार अस विचारलं तेव्हा प्रियांका ने ”पुढील वर्षी” असे उत्तर दिले.

प्रियांका सोशल मिडीयावर बरीच सक्रीय असते.अनेक फोटोज आणि व्हीडीओ ती चाहत्यांसोबत शेअर करते.वर्क फ्रंट बाबतीत सांगायचे झाल्यास प्रियांका तिच्या आगामी चित्रपट ‘टेक्स्ट फॉर यू’ मध्ये दिसणार आहे. प्रियांकाने काही दिवंसापूर्वी ‘द वाइट टाइगर’ हा चित्रपट प्रोड्यूस केला होता तसेच चित्रपटात राजकुमार राव सोबत दिसली होती.तसेच गेल्या वर्षी प्रियांका शोनाली बोसने दिदर्शीत केलेल्या ”द स्काय इज पिंक” या चित्रपटामध्ये फरहान अख्तर आणि झायरा वसीम सोबत दिसली होती.


हे ही वाचा- विकिपीडियावर वाढलेले वय बघून राखीचा नवा स्टंट

First Published on: March 27, 2021 6:53 PM
Exit mobile version