घरमनोरंजनविकिपीडियावर वाढलेले वय बघून राखीचा नवा स्टंट

विकिपीडियावर वाढलेले वय बघून राखीचा नवा स्टंट

Subscribe

राखी सावंतचे वय ३७ असून विकिपीडियावर ४२ असे दाखवले आहे.

बॉलीवूडची ड्रामेबाज अभिनेत्री राखी सावंत तिच्या अनोख्या फॅशनमुळे आणि विधानांमुळे चर्चेत असते. राखी सावंत सोशल मिडियावर नेहमीच सक्रिय असते. याशिवाय बिग बॉस १४ मधील राखीची नवी फॅशन, तिचा अवतार प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत होते. दरम्यान राखी सावंतचा एक व्हिडिओ शेअर वायरल झाला आहे. ज्यात ती तिला बारीक व्हायचे आहे हे म्हणत असून, स्वत:चे वय सांगताना दिसत आहे. विकिपीडियावर वाढलेले वय बघून राखीचा नवा स्टंट सुरु झाला आहे. राखी सावंतचे वय ३७ असून विकिपीडियावर ४२ असे दाखवले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Rakhi Sawant (@rakhisawant2511)

- Advertisement -

सोशलमिडियावर तिने एक व्हिडीओ शेअर केला आहे . ज्यात राखी सावंत ज्युसचा ग्लास घेऊन गाडीत बसताना पापाराजीने राखीला गाठले. तेव्हा ती त्यांना सांगते की, बारीक व्हायचे असेल तर, स्वत:च्या तोंडावर ताबा ठेवणे गरजेचे आहे. यावर पापाराजीने त्यांना विचारले की, तुला बारीक का व्हायचे आहे. यावर राखी म्हणाली की, बारीक होणे गरजेचे आहे कारण सर्वजण आपल्याला लवकर विसरतात , त्यासाठी आपल्याला हॉट राहणे गरजेचे आहे. तसेच नेहमीच चर्चेतही राहावे लागते आणि समाजसेवासुद्धा करावी लागते. हे सर्व तर मी करतच असते. यानंतर राखी कोरोना वॅक्सीनबाबत म्हणाली की, मी विनंती करते की, ३४ आणि ३६ वयोगटातील लोकांनाही वॅक्सीन दिले पाहिजे. यावर पापाराजीने विचारले की तुम्ही ३६ च्या आहात का? यावर राखी म्हणाली, मी काय १६ ची वाटते का? खरतर माझे वय ३७ आहे, थोडी अजून बारीक असते तर १८ ची वाटले असते. परंतु विकीपीडियावर राखीचे वय ४२ असे दाखवत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

- Advertisement -

हेही वाचा – शरद पवार शिवसेनेचे की राष्ट्रवादीचे, नाना पटोलेंना पडला प्रश्न

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -