फोटो काढताना प्रियांका विसरली ‘ही’ गोष्ट घालायला आणि झाला घोळ!

फोटो काढताना प्रियांका विसरली ‘ही’ गोष्ट घालायला आणि झाला घोळ!

निक जोन्सबरोबर लग्न झाल्यानंतर प्रियांका चोप्रा कायम सोशलमिडीयावर अपडेट असते. प्रियांका नेहमीच आपले नवनवीन फोटो सोशलमिडीयावर शेअर करते. यामुळे ती कधी चाहत्यांची वाह वा मिळवते तर कधी ट्रोल होते. काही दिवसापूर्वीच प्रियांकाने तिच्या कुटुंबियांसोबतचा एक फोटो शेअर केला होता. यामुळे ती ट्रोल झाली आहे. कारण फोटो काढण्याच्या गडबडीमध्ये प्रियांकाने एक चूक केली. यामुळे नेटकऱ्यांनी तीला ट्रोल केले.

फोटो काढताना प्रियांकाच्या ही चूक अजिबात लक्षात आली नाही. सध्या प्रियांका एका सीरिजच्या चित्रीकरणासाठी ती भारतात आली आहे. प्रियांका सध्या तिच्या आईसोबत वेळ घालवत असून यावेळी तिने आईसोबत काही नातेवाईकांची भेट घेतली. या भेटीचा एक फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केला. मात्र हा फोटो नीट पाहिल्यावर एक गोष्ट लक्षात येते ती म्हणजे प्रियांकाने एका पायामध्ये चप्पल घातलीच नव्हती. मात्र तरीदेखील तिने फोटो काढला. सध्या चाहत्यांमध्ये तिच्या या फोटोचीच चर्चा सुरु आहे. फोटो काढताना प्रियांकाच्या ही चूक लक्षात आली नाही पण नंतर फोटो बघितल्यावर प्रियांकाच्या ही चूक लक्षात आली.

सध्या चाहत्यांमध्ये तिच्या या फोटोचीच चर्चा सुरु आहे. प्रियांका चप्पल घालायची विसरली की काय? असा प्रश्न चाहते प्रियांकाला विचारत आहेत. त्यानंतर प्रियांकाने हा फोटो आपल्या स्टोरीमधून काढून टाकला. दरम्यान, प्रियांका लवकरच नेटफ्लिक्सवरील ‘द व्हाइट टायगर’ या वेब सीरिजमध्ये झळकणार आहे. सध्या या सीरिजच्या चित्रीकरणामध्ये ती व्यस्त आहे.

First Published on: November 15, 2019 10:44 AM
Exit mobile version