प्रियांकाचा बिकनीतील हॉट अंदाज पाहून पती निक जोनस म्हणाला,Yummy

प्रियांकाचा बिकनीतील हॉट अंदाज पाहून पती निक जोनस म्हणाला,Yummy

प्रियांकाचा बिकनीतील हॉट अंदाज पाहून पती निक जोनस म्हणाला, Yummy...

बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा (Priyanka chopra)सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. आपल्या व्यक्तीगत तसेच व्यावसायिक जीवनातील घडामोडी ती चाहत्यांसोबत नेहमीच शेअर करत असते. प्रियांकाचे इंस्टाग्राम अकाऊंटवर 67.6 मिलीयन फॉलोवर्स असून तिच्या प्रत्येक फोटो , व्हिडिओवर चाहते लाइक्स आणि कमेंटचा वर्षाव करतात. सध्या प्रियांका तिच्या आगामी सिनेमा ‘सिटाडेल’च्या चित्रीकरणात व्यस्त असून या बीझी शेड्यूलमधून प्रियांकाने स्वत: साठी काही खास वेळ काढला आहे. शूटींग दरम्यान ‘सिटाडेल’च्या सेटवरुन प्रियांकाने अनेक फोटो शेअर केले होते मात्र आता प्रियांकाच्या एका फोटोची भारीच चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. प्रियांकाच्या या फोटोने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला असून अत्यंत हॉट आणि फिट अंदाजात प्रियांकाने हा फोटो पोस्ट केला आहे.(priyanka chopra looking sizzling in her bikini photo)

प्रियांकाने शूटींगमधून काही वेळ ब्रेक घेतला असून आपल्या पती निक जोनस सोबत चील करताना दिसत आहे. यादरम्यान प्रियांकाने एक हॉट बिकनी परिधान केली आहे. या फोटोमध्ये प्रियांकाची फिगर पाहून चाहते तर पूरते घायाळ झाले आहेत. फोटोमध्ये प्रियांका एका सोफ्यावर झोपून सनबाथ घेत आहे. तिने रेड -ब्लॅक कलरचा बिकनी घातली आहे. आणि सन ग्लासेस लावले आहेत. या हॉट फोटोला कॅप्शन देत प्रियांकाने लिहलं आहे की, ‘Sundays like this tho…’ तर दुसऱ्या एका फोटोमध्ये निक जोनसह फोटो शेअर करत लिहलं आहे,’snack’ सध्या प्रियांकाचे दोन्ही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

याचदरम्यान प्रियांकाची बहिण अभिनेत्री परिणीती चोप्राने फोटोवर कमेंट करत भन्नाट प्रतिक्रिया दिली आहे. परिणीती म्हणाली, “प्रियांका ताई,निक जीजू हे काय चाललं आहे?, इंस्टग्रामवर कुटुबांतील व्यक्तीसुद्धा आहेत. डोळे बंद करत फोटोल लाईक करण्याचा प्रयत्न करत आहे.”
प्रियांकाच्या वर्क फ्रंट बाबतीत सांगायचे झाल्यास नुतकचं प्रियांकाने आगामी चित्रपट रेसुररेक्शन, द मॅट्रिक्सचा चौथ्या पार्टच्या पहिल्या चित्रीकरणाचे अनावरण केले. याशिवाय बॉलीवूडमध्ये प्रियांकाने अलीकडे ट्रॅव्हल एडवेंचर चित्रपट, ‘जी ले जारा’ ची घोषणा केली.


हे हि वाचा – फक्त 40 दिवस एकत्र होतो, ‘शेरशाह’च्या लेखकाने केला विक्रम-डिंपल यांच्या लव्हस्टोरीचा उलगडा

First Published on: August 30, 2021 1:45 PM
Exit mobile version