‘हे’ असणार प्रियंका चोप्रा आणि निक जोनासच्या बाळाचं नाव; मधू चोप्रांचा खुलासा

‘हे’ असणार प्रियंका चोप्रा आणि निक जोनासच्या बाळाचं नाव; मधू चोप्रांचा खुलासा

'हे' असणार प्रियंका चोप्रा आणि निक जोनासच्या बाळाचं नाव; मधू चोप्रांचा खुलासा

बॉलिवूडपासून ते हॉलिवूडपर्यंत अभिनेत्री प्रियंका चोप्राने आपल्या नावाची एक वेगळी जादू निर्माण केली आहे. बॉलिवूडमध्ये देसी गर्ल ओळख निर्माण करणारी प्रियंका तिच्या प्रोफेशनल लाइफसोबतचं पर्सनल लाइफमुळे नेहमीच चर्चेत असते. अलीकडेच प्रियंकाने सरोगसीद्वारे गोंडस बाळाला जन्म देत आई होण्याचे सुख अनुभवले. प्रियंका-निकने  जानेवारी 2022 मध्ये त्यांच्या बाळाच्या जन्माची घोषणा केली आणि तेव्हापासूनच चाहते त्या चिमुरडीची एक झलक पाहण्यासाठी आतुरतेने वाट पाहत आहेत. तसेच या बाळाच्या नावाबाबतही चर्चा सुरु झाली आहे. या जोडप्याने अद्याप आपल्या मुलाचे नाव ठेवलेले नाही, असा खुलासा आता प्रियंकाची आई मधु चोप्रा यांनी केला आहे.

मधु चोप्रा यांच्या कॉस्मेटिक क्लिनिकला 14 वर्षे पूर्ण झाली. यानिमित्ताने त्यांनी एका छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी त्यांनी मीडियाशी बोलताना प्रियंका आणि निकच्या बाळाविषयी भाष्य केल आहे. यात त्यांनी प्रियंकाच्या बाळाचे नाव कधी ठेवलं जाणार हेदेखील सांगितले आहे. प्रियंका आणि निकने एका गोंडस मुलीला जन्म दिल्याचे सांगितले जातेय.

प्रियंकाची आई मधु चोप्रा म्हणाल्या की, मी आजी झाल्याचा मला प्रचंड आनंद होत आहे. या गुड न्यूज ऐकल्यापासून मी नेहमी आनंदात असते. प्रियंकाच्या बाळांच नाव अद्याप तरी फायनल केलेले नाही. पण पंडितजी सांगतील त्याचवेळी बाळाचं ठेवण्यात येईल. असं त्या म्हणाल्या.

22 जानेवारी रोजी प्रियंका आणि निक यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांच्या पहिल्या मुलाच्या जन्माची घोषणा केली. इन्स्टाग्रामवर एक नोट शेअर करत प्रियांकाने लिहिले की, “आम्ही सरोगेटद्वारे बाळाचे स्वागत केले आहे याची पुष्टी करताना आम्हाला खूप आनंद होत आहे. आम्ही आमच्या कुटुंबावर लक्ष केंद्रित करत असल्यामुळे या विशेष काळात आम्ही गोपनियता बाळगण्याचे आवाहन करतो. खूप खूप धन्यवाद.” निक जोनासनेही हीच पोस्ट आपल्या सोशल मीडिया पेजवर शेअर केली आहे. 2018 मध्ये प्रियंका आणि निकने लग्नगाठ बांधली.


प्रियंका चोप्राने अभिषेक बच्चनचा फोन चोरत राणी मुखर्जीला केला असा मेसेज; संतापलेल्या राणीने दिले ‘हे’ उत्तर


First Published on: February 28, 2022 3:09 PM
Exit mobile version