प्रियांका करतेय पती निक जोनसला मिस,फोटो शेअर करत म्हणाली…

प्रियांका करतेय पती निक जोनसला मिस,फोटो शेअर करत म्हणाली…

प्रियांका करतेय पति निक जोनसला मिस,फोटो शेअर करत म्हणाली...

इंंटरनॅशनल स्टार तसेच बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra Jonas)सध्या तिच्या आगामी चित्रपटाच्या शूटींगमध्ये प्रचंड व्यस्त आहे. प्रियांकाजवळ  (Priyanka Chopra) अनेक सिनेमाच्या रांगा लागल्या आहेत. अमेरिका,लंडन असा दौरा केल्यानंतर प्रियांका सध्या घरी परतली आहे. याचदरम्य‌ान प्रियांकाने कोरोना व्हायरसच्या नियमांचे पालन करत तसेच सुरक्षितता बाळगत काही काळासाठी स्वत:ला होम क्वारंटाइन केलं आहे. यामुळे प्रियांका घरी असूनही घरातील सदस्याजवळ जाऊ शकत नाहीये. आशातच प्रियांकाने तिच्या पतिचा एक थ्रोबॅक फोटो सोशल मीडियावर शेअर करत लिहलं आहे की, “हॅप्पी 4 जुलै” प्रियांकाच्या इंस्टा स्टोरीवरुन निकला (Nick Jonas) प्रचंड मिस करत असल्याचे दिसत आहे. प्रियांका मोकळ्या वेळेचा उपयोग करत सोशल मीडियावर सध्या वेळ घालवत असल्याचे दिसत आहे.

काहि दिवसांपुर्वी प्रियांकाने शूटींगवरुन आल्यावर पेट डायनाला (Priyanka Chopra Pet Dog Diana) पाहून अत्यंत खूश झाली होती. प्रियांकाने डायना आणि तिचा एक सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर होता. तसेच फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहलं होतं की, “रीयूनियन” प्रियांका क्वारंटाइन दरम्यान खूप खूश दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून प्रियांका युकेमध्ये आपल्या अपकमिंग प्रोजेक्ट सिटाडेलच्या शूंटींगमध्ये व्यस्त आहे.अमेरीकेच्या यात्रेवरुन घरी परतल्यावर प्रियांकाने चाहत्यांसोबत काही खास क्षणाचे फोटो शेअर केले आहे. प्रियांकाच्या या फोटोवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे.



हे हि वाचा – पतौडी घराण्याने लव्ह जिहादच बीज पेरलं,शर्मिला टागोरने याची सुरुवात केली



 

First Published on: July 5, 2021 3:47 PM
Exit mobile version