जगात सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींमध्ये प्रियांका चोप्रा टॉपवर

जगात सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींमध्ये प्रियांका चोप्रा टॉपवर

जगात सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींमध्ये प्रियांका चोप्रा टॉपवर

बॉलिवूडची ‘देसी गर्ल’ प्रियांका चोप्रा बॉलिवूडमध्येच नाही तर हॉलिवूडमध्येही यशाचा झेंडा फडकवत आहे. एक अष्टपैलू अभिनेत्री म्हणून तिने आपली ओळख निर्माण केली. आपल्या दर्जेदार अभिनयाने तिने जगभरातील प्रेक्षकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले. सतत वाढणाऱ्या लोकप्रियतेबरोबरचं प्रियांकाच्या मानधनाच्या आकडेही दिवसेंदिवस वाढत आहेत. या आंतरराष्ट्रीय सुपरस्टारने अलीकडेच जगभरातील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या यादीत तिसरे स्थान पटकावले आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे शाहरुख खान आणि अल्लू अर्जूननंतर प्रियांका १० जणांच्या यादीतील दोन अभिनेत्रींपैक एक सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री आहे. पॅरेट Analytics ने जगभरातील मागणीच्या आधारे कलाकारांच्या मानधनासंदर्भातील डेटा जाहीर केला.

ग्लोबल आइकॉ़न टॉम हिडलेस्टन, दुलकर सलमान, सलमान खान, सुंग हूं, कियारा अडवाणी, महेश बाबू, जेनिफर लोपेज, क्रिस इवांस, स्कारलेट जोहानसन आणि जेंडाया सारख्या अनेकांनी या यादीत स्थान पटकावले आहे. परंतु प्रियांकाला या यादीत पाहणे आश्चर्याची बाब नाही. कारण तिने फिल्मोग्राफी आणि अविश्वसनीय कामांमुळे जागतिक स्तरावर कौतुकाची थाप मिळवली आहे. नुतकचं प्रियांकाने आगामी चित्रपट रेसुररेक्शन, द मॅट्रिक्सचा चौथ्या पार्टच्या पहिल्या चित्रीकरणाचे अनावरण केले. याशिवाय बॉलीवूडमध्ये प्रियांकाने अलीकडे ट्रॅव्हल एडवेंचर चित्रपट, ‘जी ले जारा’ ची घोषणा केली.


‘तारक मेहता’मधील बापूजींनी भूमिकेसाठी २८० वेळा केले मुंडण; ब्लेडमुळे झाले आजाराचे शिकार


 

First Published on: August 27, 2021 4:17 PM
Exit mobile version