घरमनोरंजन'तारक मेहता'मधील बापूजींनी भूमिकेसाठी २८० वेळा केले मुंडण; ब्लेडमुळे झाले आजाराचे शिकार

‘तारक मेहता’मधील बापूजींनी भूमिकेसाठी २८० वेळा केले मुंडण; ब्लेडमुळे झाले आजाराचे शिकार

Subscribe

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah: टीव्हीवरील सर्वाधिक लोकप्रिय ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ ही मालिका गेली १३ वर्षे प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करतेय. टीआरपी रेटिंगमध्येही मालिका अव्वल स्थानी आहे. मालिकेतील वेगवेगळ्या भूमिकांमुळे चाहत्यांमध्ये मालिकेविषयी अधिक क्रेझ पाहायला मिळते. प्रत्येक भूमिकांवर चाहत्यांकडून प्रेमाचा वर्षाव होतो, मग तो कलाकार लहान असो वा मोठा. आज ही मालिका ज्या यशस्वी टप्प्यावर येऊन पोहचलीय त्यामागे संपूर्ण टीमची मेहनत आहे. मात्र मालिकेतील सर्वात वयस्कर व्यक्तीची भूमिका अर्थात बापूजींची भूमिका मालिकेत आजही तितकीच महत्त्वाची आहे. मात्र ही भूमिका सत्यात उतरवण्यासाठी अभिनेते अमित भट्ट यांनी जे काम केलंय ते सहजच करणे शक्य नाही. अमित भट्ट यांनी आपली भूमिका परफेक्ट करण्यासाठी अनेक वेळा स्वत:चे मुंडण केले आहे. तब्बल २८० वेळा त्यांनी या मालिकेसाठी मुंडण केले आहे. मुंडण करण्यासाठी सतत ब्लेड वापरल्यामुळे ते त्वचेसंबंधीत आजाराचे शिकार झाले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Amit Bhatt (@amitbhattmkoc)

- Advertisement -

तब्बल २८० वेळी केले मुंडण

अनेक कलाकार आपली भूमिका परफेक्ट करण्यासाठी अधिक मेहनत घेत असतात. काही जण वजन कमी करतात तर काही वजन वाढवतात. अनेकदा हे कलाकार आपल्या केसांवरही एक्सपेरिमेंट करताना दिसतात. जे पाहून चाहतेही हैराण होतात. काही अशाचप्रकारे ‘तारक मेहता’मधील बापूजी अर्थात अमित भट्ट यांनी केले आहे. एका युट्यूब चॅनलसह बोलताना अमित भट्ट यांनी सांगितले की, बापूजींच्या भूमिकेसाठी त्यांनी तब्बल २८० वेळी स्वत:चे मुंडण केले आहे. शुटिंगसाठी ते दर २ ते ३ दिवसांनी मुंडण करायचे. यामुळे त्यांना त्वचेसंबंधीत आजाराचे संक्रमण झाले. ब्लेडचा उपयोग करत केस कापत असल्याने ते या आजाराचे बळी ठरले. यानंतर डॉक्टरांनी त्यांना मुंडण न करण्याचा सल्ला दिला.

का करायचे सतत मुंडण?

‘तारक मेहता’ मालिकेचे पहिले एपिसोड पाहिल्यास त्यात बापूजी (चंपकलाल)  टोपी घातल नव्हते. पहिल्या एपिसोडमध्ये त्यांना टकलचं दाखवले जायचे. मात्र सतत मुंडण करत आजार झाल्याने निर्मात्यांनी त्यांना या भूमिकेसाठी मुंडण असलेला विग वापरण्याचा सल्ला दिला होता. मात्र कालांतराने विगच्या जागी त्यांनी चंपकलाल या भूमिकेला रिअल टच देण्य़ासाठी गांधी टोपी देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळेचं बापूजी अनेकदा गांधी टोपी आणि हिवाळी मंकी कॅपमध्ये दिसतात.

- Advertisement -

Mumbai University Admissions 2021: महाविद्यालयीन प्रथम वर्ष प्रवेशाची दुसरी गुणवत्ता यादी जाहीर, कट ऑफ तीन टक्क्यांनी खाली


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -