देसी गर्ल प्रियांका चोप्राने तब्बल 11 वेळा केलं Vogue मॅगझीनसाठी फोटोशूट

देसी गर्ल प्रियांका चोप्राने तब्बल 11 वेळा केलं Vogue मॅगझीनसाठी फोटोशूट

priyanka chpora

बॉलिवूडची (bollywood)देसी गर्ल प्रियांका चोप्राने (priyanka chopra)आपल्या स्टाईलने जगभरात नवा ट्रेन्ड सेट करत आहे. प्रियांका चोप्रा तिच्या अभिनयासह ग्लॅमरस नाविन्यपूर्ण स्टाईलसाठी देखील ओळखली जाते. मिस वर्ल्ड प्रियांका चोप्राने सिनेसृष्टीत उत्तम कामगिरी बजावत आपल्या अभिनयाची छाप पाडली. नुकतच प्रियांकाने Vogue या प्रसिद्ध मॅगझीनसाठी फोटोशूट केलं आहे. सध्या हे फोटो सोशल मीडियवर प्रचंड व्हायरल होत आहेत. प्रियांकाने तिच्या सोशल मीडिया अकांऊटवर चाहत्यांसोबत काही फोटो शेअर केले आहेत.

लाल रंगाच्या आऊटफीटमध्ये प्रियांकाचा ग्लॅमरस अंदाज अगदी खुलून दिसत आहे. यासोबतच एका पिवळ्या रंगाच्या एक सुंदर ड्रेस परिधान केला आहे. प्रियांकाने अनेक फोटो शेअर करत कॅप्शन मध्ये लिहलं आहे की, 15 वर्षापूर्वी मी वोग इंडियासाठी पहिल्यांदा शूट केलं होतं. मी सुरूवातीपासून वोगच्या कवर स्टार्सपैकी एक आहे. यंदा वोग इंडिया कवरसाठी 11 व्या वेळी फोटोशूट करत आहे. यासोबतच मी Bvlgari (ज्वेलरी कंपनी) ब्रँन्ड अम्बेसिडर झाली आहे. हे कोलाबरेशन एकदम परफेक्ट आहे. हे एक असं स्वप्न आहे की याला सत्यात उतरण्यासाठी खूप कालावधी लागला. आगामी काळात काही नवीन प्रोजेक्ट देखील भेटीला येणार आहे. यामध्ये मंगळसूत्र देखील समाविष्ठ आहे. याचे फोटो लवकरच रिवील करण्यात येतील. या प्रोजेक्टवर गेल्या तीन वर्षापासून काम सुरू आहे. आणखी भलं मोठ कॅप्शन देत प्रियांकाने तिच्या आगामी प्रोजेक्ट संदर्भात चाहत्यांना सूचना दिली आहे.

फोटो पाहा- 


हे हि वाचा – कोल्ड ड्रिंकमध्ये नशेचे औषध मिसळून पॉर्न व्हिडिओ बनवला, मिस इंडिया यूनिवर्स Pari Paswanचा आरोप

First Published on: August 31, 2021 5:03 PM
Exit mobile version