प्रियंकाने दाखवली मुलगी मालतीची पहिली झलक; चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव

प्रियंकाने दाखवली मुलगी मालतीची पहिली झलक; चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव

प्रियंका चोप्राने पहिल्यांदाच तिची मुलगी मालती मेरी चोप्रा जोनासची झलक चाहत्यांना दाखवली आहे. त्याने मुलीचा फक्त अर्धा चेहरा दाखवला आहे, मात्र तिचा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. मालतीचे गुलाबी ओठ पाहून ‘ती पापा निक जोनासकडे गेली’ असे चाहते म्हणत आहेत. प्रियंकाने तिच्या मुलीचा फोटो शेअर करताना एक अतिशय गोंडस कॅप्शनही लिहिले आहे. आत्तापर्यंत प्रियांकाने मालतीचे अनेक फोटो शेअर केले आहेत, मात्र कधीही तिचा चेहरा दाखवला नव्हता. यावेळी मात्र प्रियंकाने तिच्या मुलीचा चेहरा दाखवला आहे.

प्रियंका चोप्रा ने मुलगी मालतीचा फोटो इंस्टाग्राम शेअर केला आहे. या फोटोत मालती उबदार कपड्यात दिसत आहे. मालतीचा अर्धा चेहरा बेबी स्ट्रॉलरमध्ये प्रियंकाने झोपलेला दाखवला आहे, मालती ती खूप गोंडस दिसत आहे. प्रियंकाने आपल्या मुलीवर प्रेमाचा वर्षाव केला आहे. ती स्वतः तिच्या गोंडसपणाच्या प्रेमात पडली आहे. प्रियंकाने मालतीच्या फोटोवर हार्ट इमोजी सुद्धा दिले आहेत.

प्रियंकाने मालतीचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे त्या फोटोवर चाहते सुद्धा प्रेमाचा वर्षाव करत आहेत. याच फोटोवर एका फॅनने कमेंट केली आहे. ‘किती गोंडस बाळ आहे.’ तर दुसऱ्याने लिहिले, ‘सुंदर राजकुमारी.’ एका यूजरने तर कमेंट केली की, ‘जर तुम्ही बारकाईने पाहिले तर ती तिच्या वडिलांसारखी म्हणेजच निक सारखी दिसत आहे. चाहत्यांवर सुद्धा चिमुकल्या मालतीच्या निरागस पणाची भुरळ पडली आहे.

प्रियांका चोप्रा आणि निक जोनस 2018 पासून एकमेकांना डेट करत होते. याच वर्षी निकने प्रियांकाला प्रपोज केले होते. दोघांनी मुंबईत लग्न केले आणि नंतर हिंदू आणि ख्रिश्चन रितीनुसार जोधपूरमध्ये निक आणि प्रियंकाचा शाही विवाह सोहळा पार पडला. याच वर्षी जानेवारी मध्ये निक आणि प्रियांकाच्या आयुष्यात त्यांच्या मुलीचे म्हणजेच मालतीचे आगमन झाले.

प्रियंकाचे हॉलीवूड आणि बॉलिवूड प्रोजेक्ट्स
प्रियंका चोप्रा ‘इट्स ऑल कमिंग बॅक टू मी’ आणि ‘सिटाडेल’ या मालिकेत दिसणार आहे. हा शो OTT प्लॅटफॉर्म प्राइम व्हिडिओवर येणार आहे. याशिवाय प्रियंका फरहान अख्तरच्या ‘जी ले जरा’मध्ये कतरिना कैफ आणि आलिया भट्टसो यांच्या सोबत दिसणार आहे.


हे ही वाचा – अमिताभ बच्चन यांना भेटण्यासाठी सिक्युरिटी तोडून बंगल्यामध्ये पोहोचला चाहता

First Published on: November 23, 2022 3:26 PM
Exit mobile version