अमिताभ बच्चन यांना भेटण्यासाठी सिक्युरिटी तोडून बंगल्यामध्ये पोहोचला चाहता

बॉलिवूड महानायक अमिताभ बच्चन यांनी 90 च्या शतकापासून आपल्या अभिनयाची छाप चित्रपटसृष्टीत उमटवली आहे. 80 वर्षाच्या अमिताभ यांनी 50 पेक्षा जास्त वर्ष अभिनय क्षेत्रात आपले योगदान दिले आहे. आजही अमिताभ त्यांच्या विविध चित्रपटांमुळे चर्चेत असतात. त्यांचे चाहते त्यांची एक झलक पाहण्यासाठी खूप उत्सुक असतात. अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या ब्लॉगवर जुन्या आठवणी ताज्या करत एक किस्सा सुनावला आहे आणि काही फोटो देखील शेअर केले आहेत.

अमिताभ बच्चनने यांनी शेअर केला किस्सा


अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या ब्लॉगवर एक पोस्ट शेअर करत सांगितलं की, “एके दिवशी एक छोटा चाहता सिक्योरिटीचा घेरा तोडून त्यांना भेटायला आला होता. त्यानंतर ते त्याला भेटले होते. अमिताभ यांनी त्यावेळचे काही फोटो शेअर केले आहेत. त्यांनी त्यांच्या ब्लॉगमध्ये लिहिलंय की, आणि हा छोटा चाहता, 4 वर्षाचा असताना डॉन चित्रपट पाहिला होता.आज मला भेटायला इंदौरहून पोहोचला आहे. त्याने चित्रपटांविषयी सांगितलं, डायलॉग, अभिनय सर्व काही…मला भेटण्याची त्याची इच्छा पूर्ण झाली. तेव्हा तो रडू लागला आणि माझ्या पाया पडला. जे मला अजिबात नाही आवडलं. सुरक्षेचा घेरा तोडून तो मला भेटायला आला, त्याने माझी पेंटिग बनवली होती मी त्याला ऑटोग्राफ दिला आणि त्याच्या वडीलांनी मला लिहिलेलं पत्र देखील त्याने वाचून दाखवलं. चाहत्यांच्या भावना अशाप्रकारच्याच असतात.”

दरम्यान, अमिताभ सध्या त्यांच्या ‘ऊंचाई’ चित्रपटामुळे चर्चेत आहेत. या चित्रपटात अमिताभ बच्चन, अनुपम खेर, बोमन ईरानी, अभिनेत्री परिणीती चोप्रा देखील मुख्य भूमिका साकारताना दिसून येईल. 11 नोव्हेंबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे.

 


हेही वाचा :

‘धारावी बँक’ वेब सिरीज प्रेक्षकांच्या भेटीला