Pu.La. Deshpande Birth Anniversary: पु.लं.चे ‘हे’ विनोद वाचून तुम्हाला हसू होईल अनावर

Pu.La. Deshpande Birth Anniversary: पु.लं.चे ‘हे’ विनोद वाचून तुम्हाला हसू होईल अनावर

Pu.La. Deshpande Birth Anniversary: पु.लं.चे 'हे' विनोद वाचून तुम्हाला हसू होईल अनावर

पु.लं. एकदा चाळीच्या खालून रस्त्याने चालले असताना वरून त्यांच्या डोक्यावर भात पडला. तेव्हा ते थोडा वेळा खाली तिथेच थांबले. तेव्हा कोणीतरी विचारले की, ‘थांबलात कशाला?’ त्यावर पु.लं. म्हणाले की, ‘भात आला, आता वरण कधी येतंय याची वाट पाहतोय!’


एकदा पु.लं. प्रवासात असताना त्यांना कोणीतरी भेटला, तो त्यांच्या चाहता होता. तो म्हणाला की, ‘माझी फक्त दोन व्यक्ती वर श्रद्धा आहे, एक ज्ञानेश्वर आणि दुसरे तुम्ही. माझ्या खोलीत मी ज्ञानेश्वराच्या फोटो समोर तुमचा ही फोटो ठेवलाय’, तर पु.लं म्हणाले, ‘अहो असं काही करू नका नाहीतर लोक विचारतील, ज्ञानेश्वरांनी ज्याच्याकडून वेद म्हणून घेतले तो रेडा हाच का म्हणून?’


हौसेसाठी प्रवास करणाऱ्या टूरिस्टला मराठीत काय म्हणावं, असा प्रश्न पु.लं.ना कुणी तरी विचारला त्यावर पटकन पु.लं म्हणाले, त्यात काय? ‘सफरचंद’ म्हणावं.


एका आजारात पु.लं.ची दोन्ही पावलं सुजून गुबगुबीत दिसत होती. त्यावेळी भेटायला आलेल्या एका मित्राला आपल्या सुजलेल्या पायांकडे बोट दाखवीत पु.लं. म्हणाले, ‘हे माझे पाय बघ म्हणजे तुला कळे, पायाल हिंदीत ‘पाव’ का म्हणतात ते!’


एकदा एक ‘कदम’ नावाचे गृहस्थ, पु.लं.कडे मुलगा झाल्याचे पेढे घेऊन आले, पु.लं. नी आशीर्वाद दिला, ‘कदम कदम बढाये जा’


आपल्या पत्नीच्या सतत उपदेश करण्याच्या तथाकथित सवयीमुळे पु.लं. एकदा आल्या पत्नीला (सुनीताईंना) म्हणाले की, या घरात मी तेवढा देशपांडे आहे. तू ‘उपदेश-पांडे’ आहेस.


पु.लंचा वाढदिवस होता, एका मार्केट यार्डोच्या व्यापारी चाहत्याने त्यांच्या गळ्यात सफरचंदाचा हार घातला. पु.लं. त्या वजनाने थोडे झुकले. हे बघुन व्यापारी म्हणाला, ‘काय राव, काय झाले येवढे?’ पु.लं. म्हणाले ‘बरे झाले तुम्ही नारळाचे व्यापारी नाही’


पु.लं.चा कान नेहमी दुखत असे. त्याविषयी ज्योत्स्ना भोळे त्यांना म्हणाल्या, ‘काय रे पी.एल. सारखं तुला काय होतंय?’ पु.लं. म्हणाले, ‘अहो, लोक म्हणतात ना अमुक-अमुक माणूस कामातून गेलाय, तसा मी कानातून गेलोय.’


वसंत सबनीस हे पु.लं.चे निकटचे मित्र. सबनिसांनी सांगितलेला हा किस्सा मोठा मार्मिक आहे. एकदा बोलण्याच्या ओघात खाण्यावरून काही गप्प निघाल्या. पु.लं म्हणाले, ‘आपल्याला कुणाकडं गेल्यावर असेल ते खायला चालते.’ त्यातील एक जण पटकन म्हणाला,’शेणसुद्धा?’ त्यावर पु.लं.नी त्याच्याकडे पाहिलं आणि चटकन म्हणाले की, ‘अजूनपर्यंत खावं लागलं नाही, पण तुझ्या घरी आल्यावर तेही खावं लागणार असं दिसतं. कारण तू खातोस ते मला खावंच लागेल.’


पं.सी.आर. व्यास यांच्या सत्काराचा कार्यक्रम मुंबईत होता. पु.लं देशपांडे त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. पु.लं भाषणाला उभे राहिले. व्यास यांच्याकडं पाहत म्हणाले,’आजवर अनेक व्यासपीठावरून मी भाषणं केली, पण हे ‘व्यासपीठ’ मला न झेपणारे आहे.’

First Published on: November 8, 2020 12:36 PM
Exit mobile version