सोनाली सहगलही कास्टिंग काउचची शिकार; दिग्दर्शकाने केली ‘ही’ मागणी

सोनाली सहगलही कास्टिंग काउचची शिकार; दिग्दर्शकाने केली ‘ही’ मागणी

दररोज बॉलिवूडमधील एक कास्टिंग काउचचा प्रकार समोर येतो. अनेक अभिनेत्रींनी आतापर्यंत अनेक दिग्गजांची नावं यात घेतली आहेत. आता प्यार का पंचनामा फेम सोनाली सहगलने कास्टिंग काउचवर नवीन खुलासा केला आहे. सोनालीने केलेला खुलासा ऐकून तुम्हाला देखील आश्चर्य वाटेल.

सोनालीचा धक्कादायक खुलासा

सोनाली म्हणाली, मला फिल्म देण्याची नावाखाली एका दिग्दर्शकाने मला बॉडी सर्जरी करायला सांगतिले. माझी ऑडीशन देखील चांगली झाली होती. तरी मला बॉडी सर्जरीची अट घालण्यात आली. माझी ऑडीशन चांगली झाल्यामुळे मी खूप खूष होते. पण ही अट ऐकल्यावर मी हैराण झाले. माझ्या बॉडीच्या काही विशिष्ट भागांची ही सर्जरी करायला सांगितली होती. त्यांच म्हणणं होतं की यामुळे मी अजून आकर्षक दिसले असते. पण मी त्यांची ही अट मान्य केली नाही आणि चित्रपट माझ्या हातून निघून गेला.

First Published on: April 25, 2019 5:16 PM
Exit mobile version