राहुल-दिशा येत्या 16 जुलै रोजी अडकणार विवाह बंधनात,वैदिक पद्धतीने करणार लग्न

राहुल-दिशा येत्या 16 जुलै रोजी अडकणार विवाह बंधनात,वैदिक पद्धतीने करणार लग्न

राहुल वैद्य आणि दिशाला तृतीयपंथीयानी दिला आशिर्वाद, शगुणसाठी घेतले सव्वा लाख

बिग बॉस फेम तसेच गायक राहुल वैद्य Rahul Vaidya) त्याच्या प्रेयसी म्हणजेच दिशा परमार (Disha Parmar) सोबत लवकरच विवाह बंधनात अडकणार असल्याचे संकेत दिले आहेत. येत्या 16 जुलैला दोघेही विवाह करणार असल्याचे सोशल मीडीयावर घोषित केलं आहे. राहुल वैद्य आणि दिशा परमार या पॉवर कपलची सोशल मीडीयावर प्रचंड मोठी फॅन फॉलॉईंग आहे. दोघेही सोशल मीडियावर खूप सक्रीय असतात. आपल्या चाहत्यांसोबत अनेक फोटो आणि व्हिडिओ ते नेहमीच शेअर करतात. पण दोघांचेही चाहते त्यांच्या लग्नाची आतूरतेने वाट पाहत आहेत. चाहते जाणून घेण्यासाठी खूप ऊत्सुक आहेत की दोघेही लव्ह बर्ड लग्नाच्या बेडीत कधी अडकणार आहेत. आता चाहत्यांना फार काळ वाट पाहावी लागणार नाहीये. राहुल नुकतच ‘खतरों के खिलाड़ी 11’ या रियालिटी शो केपटाऊन मधून परतला आहे. राहुलने सांगितले आहे की आम्ही दोघेही नेहमी क्लोज्ड वेडिंगच्या पक्षात आहेत. आमचा विवाह वैदिक पद्धतीन पार पडणार आहे तसेच विवाह सोहळ्यादरम्यान गुरबानी शब्द देखील गाणार आहेत.(Rahul and Disha will get married on July 16)



हे हि वाचा – HBD: बॉलिवूडचा पॉवरहाउस अभिनेता रणवीर सिंग बद्दल या खास गोष्टी तुम्हाला माहितेय का ?



 

First Published on: July 6, 2021 11:47 AM
Exit mobile version