घरमनोरंजनHBD: बॉलिवूडचा पॉवरहाउस अभिनेता रणवीर सिंग बद्दल 'या' खास गोष्टी तुम्हाला माहितेय...

HBD: बॉलिवूडचा पॉवरहाउस अभिनेता रणवीर सिंग बद्दल ‘या’ खास गोष्टी तुम्हाला माहितेय का ?

Subscribe

रणवीर बॉलिवूडचा पॉवरहाऊस अभिनेता म्हणून देखील ओळखला जातो.

बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग(Ranveer Singh)त्याच्या अभिनयकलेच्या जोरावर बॉलिवूडमधील टॉप अभिनेत्यांच्या यादित गणला जातो. इतकच नाही तर रणवीर बॉलिवूडचा पॉवरहाउस अभिनेता म्हणून देखील ओळखला जातो. अभिनयासोबतच रणवीरची फॅशन स्टाईल देखील चर्चेचा विषय ठरते. रणवीरने जेव्हा चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं तेव्हा अगदी सामान्य तरुण मुलासारखा रणवीरचा अंदाज आणि लूक होता. पण आज त्याच्यामागे संपुर्ण तरुणाई फिदा झाली आहे असं म्हंटलं तरी वावगे ठरणार नाही. रणवीर आज निर्माता तसेच दिग्दर्शकांसाठी हमाखास यश मिळवून देणारा अभिनेता म्हणून नावजला जातो. आज रणवीर त्याचा 36 वा वाढदिवस साजरा करत आहे. 6 जुलै 1985 साली रणवीरचा जन्म झाला. आणि या खास दिवसानिमित्त गली बॉय रणवीर सिंग बद्दल काही खास गोष्टी जाणून घेणार आहोत.
(HBD: Do you know these special things about Bollywood powerhouse actor Ranveer Singh?)रणवीर त्याच्या आगामी सिनेमात ’83’ मध्ये कपिल देव यांची भूमिका साकारणार आहे. हा सिनेमा 1983 च्या वर्ल्डकप वर आधारित आहे. याचदरम्यान रणवीरने त्याच्या बालपणीचा  क्रिकेटशी संबंधित एक किस्सा शेअर केला आहे. शाळेत असताना रणवीर मित्रासोबत खार जिमखानामध्ये महिंदर अमरनाथ यांच्याकडे कोचिंगसाठी गेला असता प्रॅक्टीस सेशन दरम्यान अमरनाथ यांनी रणवीरला क्रिकेट खेळतांना पाहून रिजेक्ट केलं होतं.
रणवीर आउटसाइडर आहे असं अनेकांचा समज आहे. परंतू रणवीरचे कपूर घराण्याशी संबंध आहे. रणवीर सिंग आणि अनिल कपूर दोघेही नातेवाईक आहेत. रणवीर ,सोनम तसेच रिया कपूर हे मामे भाऊ-बहिण आहेत.
रणवीरने त्याचे शिक्षण अमेरिकामधून पुर्ण केलं आहे. अमेरिकेतून परतल्यावर रणवीरने ॲडवरटाइजिंग एजंसीमध्ये काम केलं. तसेच O&M , J.Walter Thompson कंपनीमध्ये कॉपीराइटर म्हणून काम केलं आहे. बॉलिवूडमध्ये एंट्री करण्यापुर्वी रणवीरने असिस्टंट डायरेक्टरचा पदभार संभाळला होता.



हे हि वाचा- प्रियांका करतेय पती निक जोनसला मिस,फोटो शेअर करत म्हणाली…

- Advertisement -


 

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -