मुन्नाभाई ‘तिसऱ्यांदा’ येतोय तुमच्या भेटीला…

मुन्नाभाई ‘तिसऱ्यांदा’ येतोय तुमच्या भेटीला…

‘एम बोले तो…’ म्हणत प्रेक्षकांचं तूफान मनोरंजन करणारा मुन्नाभाई एका नव्या रुपात तुमच्या भेटीला येतो आहे.

तमाम चाहत्यांचा लाडका मुन्नाभाई पुन्हा एकदा त्यांना भेटायला येतो आहे. लवकरच ‘मुन्नाभाई’ चा तिसरा नवा-कोरा सिक्वेल येणार आहे. संजय दत्तच्या चाहत्यांसाठी ही खूप मोठी खूषखबर म्हणावी लागेल. निर्माता-दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांनी मुन्नाभाईच्या तिसऱ्या पार्टची अधिकृत घोषणा केली आहे.

मुन्नाभईचा ‘तिसरा’ अवतार

संजय दत्तच्या जीवनावर आधारित ‘संजू’ या सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त असलेल्या राजकुमार हिरानी यांनी ही खूषखबर दिली आहे. लवकरच मुन्नाभाईचा तिसरा पार्ट घेऊन येणार असल्याचं राजकुमार हिरानींनी जाहीर केलं आहे. आऊटलूक मासिकाला दिलेल्या मुलाखतीदरम्यान राजकुमार यांनी चाहत्यांसाठी ही आनंदाची बातमी दिली.

 कधी येणार तिसरा पार्ट?

याविषयी बोलताना राजकुमार हिरानी म्हणाले, ”गेल्या अनेक दिवसांपासून मी या सिनेमावर काम सुरु केले होते. सिनेमातील काही गोष्टी नक्की देखील करण्यात आल्या होत्या. मात्र मला पहिल्या दोन भागांच्या तुलनेत तितक्या ताकदीची कथा मिळत नसल्याने कामाला गती येत मिळत नव्हती. मात्र आता लवकरच एक नवी संकल्पना आणि दमदार कथा घेऊन आम्ही लवकरच सिनेमाला सुरुवात करू.”

पहिले दोन भाग सुपरहिट

२००३ साली प्रदर्शित झालेला ‘मुन्नाभाई MBBS’ हा सिनेमा सुपर-डुपर हिट ठरला होता. त्यानंतर २००६ साली आला सिनेमाचा सिक्वेल – ‘लगे रहो मुन्नाभाई’. याही सिनेमाला प्रेक्षकांनी तुफान पसंती मिळाली होती. ‘लगे रहो मुन्नाभाई’मध्ये निखळ मनोरंजनासोबतच एक उत्तम सामाजिक संदेश देखील देण्यात आला होता. उत्तम दिग्दर्शन, कलाकारांचा दमदार अभिनय आणि मुख्य म्हणजे सर्वसामान्यांना भिडणाऱ्या विषयांचं दर्जेदार सादरीकरण या सर्व पैलूंमुळे ‘मुन्नाभाई’चे पहिले दोनही भाग यशस्वी ठरले. आता तिसऱ्या सिक्वेलमध्ये मुन्नाभाई काय कमाल दाखवतोय हे पाहाणं औत्सुक्याचं ठरेल.

 

 

First Published on: May 23, 2018 4:59 AM
Exit mobile version