राज कुंद्राचा तुरुंग प्रवास लांबला, २० ऑगस्टला होणार सुनावणी

राज कुंद्राचा तुरुंग प्रवास लांबला, २० ऑगस्टला होणार सुनावणी

Raj Kundra Case: : राज कुंद्राला सुप्रीम कोर्टाचा दिलासा! अटकेला ४ आठवड्यांची स्थगिती

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि उद्योजक राज कुंद्रा याच्या समोरील अडचणी दिवसेंदिवस वाढतच आहेत. अशातच राज कुंद्राची तुरुंगवासाचा कालावधी सत्र न्यायालायाने पुन्हा वाढवला आहे. पॉर्न फिल्मची निर्मिती करत ते विविध पॉर्न अॅपवर प्रदर्शित केल्याप्रकरणी राज कुंद्राला १९ जुलैला अटक करण्यात आली होती. या अटकेनंतर राज कुंद्राने जामिनासाठी अनेकदा अर्ज केला. मात्र त्याच्या जामिनाची सुनावणी आता पुन्हा पुढे ढकलत त्याची तुरुंगवासाची मुदत २० ऑगस्टपर्यंत वाढवली आहे.

गुन्हे शाखेनं न्यायलया समोर १९ कारणं देत राज कुंद्राच्या जामिन्याला विरोध केला आहे. विरोध करताना गुन्हे शाखेने सांगितले की, कुंद्राला या प्रकरणात सहकार्य करत नसून त्याची चौकशी सुरु आहे. परंतु अजून बरेच साक्षीदार आणि बळी जबाब नोंदवण्यासाठी पुढे येत आहेत. तर अनेक पुरावे गोळा करणे बाकी आहे. तसेच कुंद्रा पुरावे नष्ट देखील करू शकतो आणि साक्षीदारांवर प्रभाव टाकू शकतो. त्यांनी हे देखील निदर्शनास आणलं की, तो एक ब्रिटिश नागरिक असल्याने, तो देश सोडून पळून जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

तपास अधिकारी किरण बिडवे यांनी म्हटलं आहे की, कुंद्राला अटक होण्यापूर्वी बरेच पुरावे नष्ट करण्यात आले आहेत. त्यामुळे त्याला जामीन दिल्यास तो अधिक पुरावे पुरावे नष्ट करु शकतो.

शिल्पा शेट्टी पतीच्या अटकेनंतर आता पहिल्यांदाच चाहत्यांसमोर येण्यास सज्ज झाली आहे. माध्यमांच्या माहितीनुसार, शिल्पा १५ ऑगस्ट रोजी “वी फॉर इंडिया”च्या माध्यमातून फेसबुक लाईव्हवर करणार आहे.


 

First Published on: August 11, 2021 7:56 PM
Exit mobile version