IPL सट्टेबाजी पासून ते बिटकॉईन फ्रॉड, राज कुंद्रावर झाले आहेत गंभीर आरोप

IPL सट्टेबाजी पासून ते बिटकॉईन फ्रॉड, राज कुंद्रावर झाले आहेत गंभीर आरोप

IPL सट्टेबाजी पासून ते बिटकॉईन फ्रॉड, राज कुंद्रावर झाले आहेत गंभीर आरोप

प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि उद्योजक राज कुंद्रा याला पॉर्न फिल्म चित्रीकरण प्रकरणाबाबत अटक करण्यात आली असून राज कुंद्राला २३ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. राज कुंद्रा आणि कंपनीचा आयटी हेड रायन याला देखील अटक झाली आहे. यामुळे राज कुंद्राच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. यापुर्वी सुद्धा राज कुंद्राला या प्रकरणात चौकशीसाठी बोलवलं असल्याची माहिती समोर आली होती. आमच्याकडे कुंद्रा विरोधात पुरावे असल्याचे मुंबई पोलिस आयुक्त हेमंत नगराळे यांच्याकडून सांगण्यात आले. अशातच राज कुंद्रा पुर्वी सुद्धा अनेकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. त्याच्यावर बिटकॉईन फ्रॉड पासून ते आयपील मध्ये सट्टेबाजी करण्याचे गंभीर गुन्हा दाखल करण्यात आले आहेत.

शॉपिंग चॅनल वाद-

2015 मध्ये राज कुंद्रा शॉपिंग चॅनल बेस्ट डील टीव्हीसोबत प्रमोटर्स म्हणून जोडला गेला होता. तसेच या चॅनल मधून राजीनामा दिल्यानंतर राजवर कर्मचाऱ्यांचे पगार थकवल्याचा आरोप लावण्यात आला होता.तसेच राजने कर्जाची परतफेड सुद्धा केली नसल्याचे बोलण्यात येत होते. यानंतर राजने या सर्व अफवा असल्याचे घोषीत केले.

आयपीएल मध्ये सट्टेबाजी-

2009 साली राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टीने आयपीएलमध्ये प्रवेश केला होता. त्यांनी राजस्थान रॉयल्स टिमवर ताबा मिळवला होता. यानंतर 2013 मध्ये आईपीएल सट्टेबाजीमध्ये राज कुंद्राचे नाव आले होते. इतकचं नही तर या प्रकरणात राजस्थान रॉयल्स मधील श्रीसंत सहित तीन खेडाळूंना अटक करण्यात आली होती. दिल्ली पोलिसांनी त्या वेळी राज कुंद्राची 10 तास चौकशी केली होती. तसेच दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार राज कुंद्राने सट्टेबाजी केली असल्याचे कबूल केलं आहे. त्याने सट्टेबाजी करीता खूप पैसा खर्च केला असल्याचे सांगितले. यानंतर 2015 साली आयपीएलने राज कुंद्रावर आजीवन बंदी घातली होती.

बिटकॉईन घोटाळा

बिटकॉईन घोटाळ्या दरम्यान ईडी तर्फे राज कुंद्राची चौकशी करण्यात आली होती. राजने या प्रकरणात माझा काहीच दोष नसल्याचे कबूल केलं होतं. तसेच संपुर्ण तपासात मी सहयोग करणार आहे असं स्टेटमेंट जाहीर केलं होते. यानंतर पोलिसांनी मुख्य आरोपी अमित भारद्वाज याला अटक केली होती. तसेच या संपुर्ण घोटाळ्यात राज कुंद्रा सह अनेक कलाकार याचा प्रचार करत असल्याचे उघडकीस आले होते

अंडरवर्ल्ड मधून बिजनेस डील

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या जवळील व्यक्ती इकबाल मिर्ची याच्या सोबत राज कुंद्राचे नाव जोडण्यात आले होते. 2019 मध्ये ईडीने केलेल्या चौकशी दरम्यान राजने सर्व आरोप फेटाळले होते.


हे हि वाचा – १४ वर्षांनंतर चित्रपटात शिल्पाचे कमबॅक, पण पतीच्या अटकेनंतर शिल्पा बॅकफुटला

First Published on: July 21, 2021 12:12 PM
Exit mobile version