राजेश खन्ना यांना मृत्यूपेक्षा ‘या’ गोष्टीचे होते सर्वाधिक भय

एकेकाळचे बॉलीवूड सुपरस्टार राजेश खन्ना यांनी ‘आखिरी खत’ या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर एन्ट्री केली. आपल्या खास स्टाईलमुळे ते अल्पावधीतच चाहत्यांच्या गळ्यातले ताईत बनले. ते जिथे जायचे तिथे त्यांची एक झलक बघण्यासाठी चाहत्यांची गर्दी व्हायची. पण पैसा व प्रसि्दधी मिळूनही राजेश खन्ना एकटेच होते. त्याच एकटेपणाची भिती त्यांना मृत्यूपेक्षाही अधिक वाटायची. यामुळे ते रात्रभर टिव्ही व लाईट चालू ठेवूनच झोपायचे. अशी माहिती त्यांची खास मैत्रिण अनिता अडवाणी हीने एका इंग्रजी वृत्तवाहीनीला दिलेल्या मुलाखतीत दिली आहे.

या मुलाखतीत अनिता यांनी राजेश खन्ना यांच्याबरोबरच्या त्यांच्या नात्याबदद्ल सांगितले होते. अनिता १३ वर्षांच्या होत्या त्यावेळी त्या पहील्यांदाच राजेश खन्ना यांना भेटल्या होत्या. राजेश खन्ना त्यावेळी सुपरस्टार होते. त्यांच्या एका चित्रपटाचे शूटींग सुरू होते. ते शूटींग बघण्यासाठी एका नातेवाईकाबरोबर अनिता महबूब स्टुडिओमध्ये गेल्या होत्या. त्यानंतर आठ दहावेळा त्या राजेश खन्ना यांना भेटल्या. पण नंतर त्या जयपूरला निघून गेल्या. त्यानंतर १९९१ साली एका पार्टीत अनिता राजेश यांची भेट झाली.नंतर मात्र त्यांच्या भेटीगाठी वाढत गेल्या. अनिताचे राजेश यांच्या आशिर्वाद बंगल्यावर येणेजाणे वाढले. पण एवढं वैभव , पैसा व प्रसिद्धी असूनही राजेश खन्ना एकटे पडले होते. पत्नी डिंपल मुलींना घेऊन
कायमची माहेरी निघून गेली होती. यामुळे राजेश एकटेच बंगल्यात राहत. पण याच एकटेपणाची त्यांना भिती वाटायची. यामुळे ते रात्री झोपताना लाईट सुरू ठेवत, टिव्हीही सुरू ठेऊन ते झोपतं. त्यामुळे घरात ते एकटे नाहीत असे त्यांना वाटायचे असे अनिता यांनी सांगितले होते.

एका मुलाखतीत तर राजेश खन्ना यांनी आयुष्यात आपल्याला सर्वच उत्तम मिळाले. यामुळे त्यांना कुठल्याही गोष्टींचा पश्चाताप नसून ते पूर्ण समाधानी आहेत. यामुळे आपण मृत्यूला घाबरत नसल्याचे व मृत्यूशय्येवर असताना मृत्यूचे हसून स्वागत करू असे त्यांनी म्हटले होते. पण प्रत्यक्षात राजेश खन्ना एकटेपणाला सर्वाधिक घाबरत होते.

First Published on: June 19, 2021 6:01 PM
Exit mobile version