थलायवा असाच हवा! कलाकारांच्या मदतीला रजनीकांत पुन्हा धावला!

थलायवा असाच हवा! कलाकारांच्या मदतीला रजनीकांत पुन्हा धावला!

रजनीकांत

कोरोना व्हायरसच्या गंभीर परिस्थितीत बॉलिवूड विश्वासह इतर क्षेत्रातील मंडळी देखील कोरोनाविरोधातील युद्धात पुढे सरसावत आहेत. आता या यादीमध्ये तमिळमधील टॉलिवूड विश्वातील थलायवा सुपरस्टार रजनीकांत यांचेही नाव समाविष्ट झाले आहे. फिल्म एम्प्लॉईज फेडरेशन ऑफ साऊथ इंडियाला ५० लाख रुपयांची आर्थिक मदत दिल्यानंतर आता रजनीकांत नदीगर संगम येथील कलाकारांच्या मदतीसाठी पुढे आला आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, रजनीकांत नदीगर संगमच्या सुमारे हजारो कलाकारांना किराणा सामान उपलब्ध करून देणार आहे. त्यामुळे थलायवा हवा तर असाच !

कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर चित्रपटाचे शूटिंग जवळजवळ पूर्णपणे थांबले आहे. अशा परिस्थितीत दक्षिण भारतीय आर्टिस्ट असोसिएशनच्या (नदीगर संगम) अनेक कलाकारांना दैनंदिन गरजांसाठी संघर्ष करावा लागत आहे. अशा परिस्थितीत सुपरस्टार रजनीकांतने नदीगर संगमातील १००० कलाकारांना किराणा सामान देण्याचा विचार केला आहे. यामुळे कोरोना युद्धादरम्यान संकटात सापडलेल्या कलाकारांच्या कुटुंबास मदत होऊ शकते. मी तुम्हाला सांगतो की, रजनीकांतशिवाय त्यांचे फॅनक्लबचे सदस्यदेखील लोकांच्या मदतीसाठी सतत प्रयत्न करत आहेत. गरजूंना भाजी, तांदूळ, दुध आणि अनेक जीवनावश्यक वस्तू ते पुरवत आहेत.

दरम्यान, रजनीकांतने दरबार या चित्रपटात अभिनय केला होता, ज्यामध्ये त्याने एका पोलिस कर्मचाऱ्याची भूमिका साकारली होती. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरही चांगली कमाई केली होती.


गल्लोगल्ली भटकणाऱ्यांसाठी मुंबई पोलिसांचं ‘गलीबॉय’ फेम ट्वीट
First Published on: April 23, 2020 12:59 PM
Exit mobile version