घरमनोरंजनगल्लोगल्ली भटकणाऱ्यांसाठी मुंबई पोलिसांचं 'गलीबॉय' फेम ट्वीट

गल्लोगल्ली भटकणाऱ्यांसाठी मुंबई पोलिसांचं ‘गलीबॉय’ फेम ट्वीट

Subscribe

संपुर्ण देशात कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर ३ मेपर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. दरम्यान सरकार आणि पोलीस प्रशासन नागरिकांना घरात रहा, सुरक्षित रहा, असे आवाहन करत आहे. मात्र असे असतानाही काही नागरिक नियमांचे पालन करताना दिसत नाही. म्हणून मुंबई पोलीस काही न काही युक्त्यांचा वापर करताना दिसताय. मंगळवारी मुंबई पोलिसांनी लॉकडाऊनदरम्यान आपल्या घरातून विनाकारण बाहेर पडणाऱ्या नागरिकांना सावधान करण्यासाठी अभिनेता रणवीर सिंग आणि अभिनेत्री आलिया भट्ट यांनी मुख्य भूमिका साकारलेल्या गली बॉय या चित्रपटासंबंधी एक ट्विट तयार केले आहे. गल्लोगल्ली भटकणाऱ्यांसाठी मुंबई पोलिसांनी थेट ‘गल्लीबॉय’ स्टाईलनेच आवाहन केले आहे.

मुंबई पोलिसांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर गली बॉय चित्रपटातील आलियाचा हासरा चेहरा असणारा फोटो शेअर केला आहे. हा फोटो गली बॉयमधील असून पोलिसांनी यावर विनोदी मिम्स तयार करून त्याला कॅप्शन ‘एबॉर्ट मिशन’ – आम्ही पुन्हा म्हणतो ‘एबॉर्ट मिशन’ ! घरी रहा सुरक्षित रहा.

- Advertisement -

कोरोनो व्हायरसच्या संकटादरम्यान, मुंबई पोलिस सुरक्षेच्या दृष्टीकोनातून लोकांना जागरूक करण्यासाठी विविध चित्रपटांचे संदर्भ घेऊन ट्विट शेअर करत आहेत. काही दिवसांपूर्वी मुंबई पोलिसांनी श्रद्धा कपूरचा हॉरर-ड्रामा “स्त्री” चित्रपटाच्या डायलॉगचा वापर करून लोकांना घरामध्येच राहण्याचे आवाहन केले होते.

- Advertisement -

असे होते ते ट्विट

मुंबईमध्ये कोरोना व्हायरसपासून लोकांना जागरूक करण्यासाठी मुंबई पोलिसांनी श्रद्धा कपूरच्या ‘स्त्री’ चित्रपटातील ‘ओ स्त्री कल आना’ या डायलॉगच्या जागी ‘ओ कोरोना कभी मत आना’ असे लिहिले आहे. मुंबई पोलिसांनी हा संदेश आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर पोस्ट केला आहे. यावेळी त्यांनी ‘घरी रहा, सुरक्षित रहा’ असा एकमेव मंत्र सांगितला आहे.


‘ओ करोना कभी मत आना’ मुंबई पोलिसांच्या ट्विटवर श्रद्धाचा भन्नाट रिप्लाय

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -