रजनीकांतचा जावई धनुष दुसऱ्या लग्नाच्या तयारीत, 18 वर्षांचा संसार मोडून हिच्याशी करणार लग्न

रजनीकांतचा जावई धनुष दुसऱ्या लग्नाच्या तयारीत, 18 वर्षांचा संसार मोडून हिच्याशी करणार लग्न

कलाकारांचे प्रेमप्रकरण, लग्न आणि घटस्फोटाच्या चर्चा सोशल मीडियावर नेहमीच रंगताना दिसतात. कारण त्यांच्या चाहत्यांनाही त्यांच्या आयुष्यात काय चालू आहे याचे कुतुहल असते. कलाक्षेत्रातील अनेक जोडप्यांनी वर्षांनूवर्ष एकत्र राहून घटस्फोट घेण्याचा निर्णय सहज घेतला आहे. यात मोठ्या कलाकारांचाही सहभाग आहे. यातील एक जोडपं दाक्षिणात्य सुपरस्टार धनुष आणि रजनीकांत यांची मुलगी ऐश्वर्या यांचे आहे.

हेही वाचा – उर्फीला भेटला बॉयफ्रेंड; नेटकरी म्हणाले… त्याला कपड्यांवर खर्च करावा लागणार नाही

धनुष लवकरच मल्याळम अभिनेत्री मीनाबरोबर दुसरं लग्न करणार असल्याचे बोलले जात आहे. माध्यमातील वृत्तानुसार अभिनेता बलवानने एका मुलाखतीमध्ये धनुषच्या दुसऱ्या लग्नाबाबत खुलासा केला आहे. तसेच धनुष लग्नाची तयारी करत असल्याचेही त्याने म्हटले आहे. धनुष जिच्यासोबत लग्न करणार आहे तिचेही याआधी लग्न झाले आहे आणि तिलाही एक लहान मुलगी आहे.
२००२ मध्ये ‘काढल कोंडेल’च्या चित्रपटाच्या स्क्रीनिंगच्या वेळी रजनीकांतची मुलगी ऐश्वर्या आणि धनुष यांची पहिली भेट झाली होती. धनुषचे चित्रपटातील काम पाहून ऐश्वर्या त्याच क्षणी त्याच्या प्रेमात पडली आणि तिने धनुषकडे मैत्रिचा हात पुढे केला. यानंतर दोघांची मैत्री वाढत गेली आणि मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. त्यानंतर दोघांनी २००४ साली घरच्यांच्या संमतीने लग्न केले. दाक्षिणात्य कलाविश्वातील गाजलेल्या लग्नसोहळ्यांपैकी दोघांचा लग्न सोहळा एक होता. मात्र गेल्या वर्षी दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला होता.

हेही वाचा – नवज्योत सिंह सिद्धूंच्या पत्नीला कॅन्सरचे निदान; पतीसाठी भावनिक पोस्ट, म्हणाल्या…

First Published on: March 24, 2023 10:45 PM
Exit mobile version