Badhaai Do Release Date: बधाई दो ‘या’ दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Badhaai Do Release Date:  बधाई दो ‘या’ दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Badhaai Do Release Date: बधाई दो 'या' दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला, ट्रेलरनंतर खुलासा

बॉलिवूड अभिनेता राजकुमार राव (Rajkumar rao)  आणि अभिनेत्री भूमी पेडणेकर (bhumi pednekar ) यांच्या बहुप्रतिक्षित ‘बधाई दो’ (badhaai do)  या सिनेमांचा ट्रेलर आज मंगळवारी रिलीज होणार आहे. दोघांनी सोशल मीडियावरुन त्यांच्या चाहत्यांना ही गुड न्यूज दिलीय. ट्रेलर सोबतच आता सिनेमाच्या रिलीज डेटचा देखील खुलासा झाला आहे. सिनेमाच्या निर्मात्यांकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नसली बधाई दो हा सिनेमा येत्या 11 फेब्रुवारीला रिलीज होण्याची शक्यता आहे. हा सिनेमा ओटीटीवर रिलीज होण्याची शक्यता होती मात्र निर्मात्यांनी सिनेमा थिएटरमध्ये रिलीज करण्याचा निर्णय घेतला आहे. राजकुमार राव आणि भूमी पेडणेकरने केलेल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये देखील हे म्हटले आहे.

एका मीडिया हाऊसने दिलेल्या माहितीनुसार, बधाई दो हा सिनेमा थिएटरमध्ये रिलीज करण्यासाठी निर्मात्यांनी काही टेस्ट केल्या. त्यातून त्यांना पॉझिटीव्ह रिझल्ट मिळाल्यानंतर सिनेमा थिएटरच्या मोठ्या पडद्यावर आणण्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतला असून 11 फेब्रुवारीला सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 11 फेब्रुवारीलाच दीपिका पादुकोणचा गहराइया देखील ओटीटी प्लॅटफॉर्म अमॅझोन प्राइमवर रिलीज होणार आहे.

2018मध्ये रिलीज झालेल्या ‘बधाई हो’ या सिनेमाचा हा सिक्वेल असून प्रेक्षक बधाई दोची प्रेक्षक अनेक दिवसांपासून वाट पाहत होते. बधाई हो सिनेमात आयुषमान खुराना आणि सान्या मल्होत्रा यांनी प्रमुख भूमिका केल्या होत्या. बधाई दो या सिक्वेलमध्ये आता राजकुमार राव आणि भूमी पेडणेकर प्रमुख भूमिकेत असणार आहे. राजकुमार यात एका पोलिसाच्या भूमिकेत असून भूमी पेडणेकर एका स्कूल टीचरची भूमिका निभावणार आहे.

भूमी आणि राजकुमार यांनी सोशल मीडियावर सिनेमाचे पोस्टर शेअर करत ट्रेलरची घोषणा केली. राजकुमारने म्हटले होते, ‘उद्या येतोय आमचा ट्रेलर, उद्या बधाई द्या. आजही द्यायची असेल तर देऊ शकता. बधाई दो थिएटर्समध्ये येत असून आता आम्ही आणखी सीक्रेट ठेवू शकत नाही’.


हेही वाचा – गुरू रंधावाच्या गाण्यासाठी प्रज्ञा जैस्वालने Salmanकडून मागितली होती ‘या’ गोष्टीची परवानगी, वाचून बसेल धक्का

First Published on: January 25, 2022 8:03 AM
Exit mobile version