प्रेक्षकांना खळखळून हसवणारा विनोदवीर काळाच्या पडद्याआड

प्रेक्षकांना खळखळून हसवणारा विनोदवीर काळाच्या पडद्याआड

मागील दीड महिन्यांपासून (42 दिवस) एम्स रूग्णालयात उपचार घेत असणाऱ्या राजू श्रीवास्तव यांचे 22 सप्टेंबर (काल) रोजी वयाच्या 59 व्या वर्षी निधन झाले. आज राजू श्रीवास्तव यांच्यावर दिल्लीच्या निगमबोध घाटामध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी राजू श्रीवास्तव यांचे कुटुंबीय, नातेवाईक, राजकीय पक्षातील नेते तसेच अनेक कलाकारही उपस्थित होते. सर्वांना खळखळून हसवणारा विनोदी कलाकार आज काळाच्या पडद्याआड झाला. राजू श्रीवास्तव यांच्या जाण्याने त्यांच्या चाहता वर्गही शोकसमुद्रात बुडाला आहे.

निगमबोध घाटावर झाले अंत्यसंस्कार


राजू श्रीवास्तव यांचे पार्थिव शरीर निगमबोध घाट आणलं गेलं. त्यांना शेवटं पाहण्यासाठी हास्यजगतातील अनेक कलाकार उपस्थित होते. तसेच राजूंचे कानपूर येथील अनेक मित्र त्यांना शेवटचं पाहण्यासाठी आले होते. यावेळी यूपीचे पर्यटन मंत्री, सुनील पाल, मधुर भंडारकर सुद्धा स्मशान घाटावर उपस्थित होते.

दिल्लीतील एम्स रूग्णालयात घेत होते उपचार
10 ऑगस्ट रोजी त्यांना दिल्ली येथील रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. वारंवार त्यांच्या प्रकृतीच्या नवीन अपडेट समोर येत होत्या. मागील काही दिवसांपूर्वी राजू यांची प्रकृती सुधारत असल्याचं सांगितलं जात होतं. परंतु त्यानंतर त्यांची प्रकृती पुन्हा खालावली असून आज दिल्लीतील एम्स रूग्णालयात अखेरचा श्वास घेतला. हिंदी टेलिव्हिजन आणि चित्रपटसृष्टीत आपल्या विनोदाचा ठसा उमटवणाऱ्या विनोदवीराच्या जाण्याने अनेक कलाकार शोक व्यक्त करत आहेत.

राजू श्रीवास्तव यांची तब्येत कधी आणि कशी बिघडली?
राजू श्रीवास्तव हॉटेलच्या जिममध्ये वर्कआउट करत होते. ट्रेडमिलवर व्यायाम करत असताना त्यांना छातीत दुखू लागले आणि ते खाली कोसळले. यानंतर राजू श्रीवास्तव यांना त्यांच्या जिम ट्रेनरने तातडीने रुग्णालयात नेले. तेव्हापासून राजू दिल्लीच्या एम्समध्ये डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचा घेत आहेत. सर्वोत्कृष्ट डॉक्टरांची टीम त्यांच्यावर उपचार करत आहे आणि प्रत्येक क्षणी त्यांचे निरीक्षण करत आहे.

‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चँलेंज’ कार्यक्रमाने मिळाली ओळख
राजू श्रीवास्तव यांना कॉमेडीचा बादशाह म्हटलं जातं. त्यांनी आत्तापर्यंत अनेक चित्रपट आणि टेलिव्हिजन कार्यक्रमांमध्ये काम केले आहे. ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चँलेंज’ या कार्यक्रमाने राजू श्रीवास्तव यांना ओळख दिली.


हेही वाचा :

राजू श्रीवास्तव यांच्यावर उद्या दिल्ली येथे होणार अंत्यसंस्कार

First Published on: September 22, 2022 1:37 PM
Exit mobile version