जो माझा नाही होऊ शकला, तो तुझाही नाही होणार… राखीने दिला आदिलच्या गर्लफ्रेंडला शाप

जो माझा नाही होऊ शकला, तो तुझाही नाही होणार… राखीने दिला आदिलच्या गर्लफ्रेंडला शाप

ड्रामा क्वीन राखी सावंत मागील अनेक दिवसांपासून तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. नुकत्याच काही दिवसांपूर्वी राखीच्या आईचे निधन झाले. त्या दुःखातून बाहेर पडेपर्यंत राखीच्या आयुष्यात पुन्हा एक दुःखाचा डोंगर कोसळला. राखीचा पती आदिल खान दुर्रानीचे विवाहबाह्य संबंध आणि कौटुंबिक हिंसाचार, मारहानीचे आरोप करत आदिलवर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार देखील केली होती. त्यानंतर त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी अंधेरी कोर्टाने सुनावली होती. आदिल कोठडीत असला तरी राखी मात्र सातत्याने त्याच्यावर नवनवीन आरोप करत आहे. त्याचं पहिलं लग्न झालं होतं, असा खुलासा तिने केला, तसेच त्याचं अफेअर असून त्याच्या गर्लफ्रेंडचं नावही सर्वांसमोर सांगितलं होतं.

दरम्यान, मागील अनेक दिवसांपासून राखीच्या लग्नाबाबत चर्चा सुरु आहेत. प्रत्येक दिवशी एक नवीन बातमी समोर आहे. बिग बॉस मराठीतून बाहेर आल्यावर राखीने तिच्या आणि आदिलच्या लग्नाचा खुलासा केला होता यावेळी आदिलच्या घरचे त्यांच्या लग्नासाठी तयार नाहीत आणि आदिलचे विवाहबाह्य संबंध असल्याचं देखील म्हणाली होती.

 


हेही वाचा :

त्याला माहीत नाही… कंगनाने साधला आमीर खानवर निशाणा

First Published on: February 11, 2023 12:32 PM
Exit mobile version