‘ड्रामा गर्ल’ राखी सावंतची मेंढ्यांच्या कळपांत नौटंकी

‘ड्रामा गर्ल’ राखी सावंतची मेंढ्यांच्या कळपांत नौटंकी

बॉलिवूडची ड्रामा क्वीन अभिनेत्री राखी सावंत तिच्या नव्या पार्टनरसोबत आयुष्यातील आनंदाचे अविस्मरणीय क्षण जगत आहे. आदिललाही राखी सावंत खूप आवडते. सध्या दोघं म्हैसूरमध्ये व्हेकेशन एन्जॉय करताना दिसतायत. ड्रामा क्वीन राखी सावंत एंटरटेनमेंटची एक दुकान आहे. तिने काहीही केले, काहीही बोलली तरी सर्व काही व्हायरल होते. यातच राखाची एक नवा व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यात राखी मेंढ्यांच्या कळपात नौटंकी करताना दिसतेय.

राखीचा व्हायरल होणारा व्हिडीओ इतका मजेशीर आहे की, तिचे नखरे पाहून यूजर्सही मज्जा घेत आहेत. या व्हिडीओवर चाहते एकामागून एक कमेंट्स करत आहेत. तर काहीजण तिची खिल्लीही उडवत आहेत. व्हिडिओमध्ये राखी सावंत हातात लाकडी छडी घेऊन मेंढ्यांना चरवताना दिसतेय. तर रस्त्यावरून चालणाऱ्या मेंढ्यांना ती बाजूलाही सारताना दिसतेय. लॉन्ग बॉडी फिटेड ड्रेस आणि स्पोर्ट शूजमधली राखी सावंतची स्टाइल पाहण्यासारखी आहे. राखी सावंत या मेंढ्यांना हकलवताना तोंडातून मेंढ्या-बकऱ्यांसारखा आवाजही काढताना दिसतेय.

वाटेत दिसणाऱ्या सर्व मेंढ्या तिच्याच असल्याचं राखी सांगतेय. यावर आदिल व्हिडीओ बनवत विचारतोय की, काय करतोयस, मेंढ्या चरवतेयस का? यावर राखी सावंत म्हणते की, होय, या माझ्या मेंढ्या आहेत. मी त्यांना खाऊ घालतेय. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर यूजर्संनाही हसू थांबत नाही आहे. राखी सावंतच्या या स्टाईलने काहीजण भडकले आहेत, तर काही जण तिला ट्रोल करतायत. काही ट्रोलर्स म्हणतायत की, राखी सावंतला अखेर योग्य काम मिळाले आहे. एका यूजरने कमेंट करत लिहिले की, आज राखी सावंत तिच्या योग्य ठिकाणी आहे. योग्य गोष्ट करत आहे.

राखी सावंतचे नाव जिभेवर येताच चेहऱ्यावर मोठे हसू येते. ड्रामा क्वीन म्हणा किंवा एंटरटेनमेंट क्वीन म्हणा, राखी सावंत मजेशीर अभिनेत्री आहे. ही अभिनेत्री नेहमीच आपल्या शब्दांनी प्रेक्षकांना गुदगुल्या करत असते. काही दिवसांपूर्वी राखी सावंत आणि आदिल लव्ह बाईटमुळे चर्चेत आले होते. याशिवाय राखी सावंतने तिच्या गळ्यात हिऱ्याचा हार घातला होता, ज्याबद्दल राखीने सांगितले की, तिने हा डायमंड सेट आदिलने घातला होता. दोघांमध्ये फुल ऑन रोमान्स पाहायला मिळत आहे. राखी सावंतचे चाहतेही तिला खुश पाहून खूश झाले आहेत.


मुंबईच्या रस्त्यावर विराट अनुष्काची स्कूटी राईड


First Published on: August 21, 2022 4:01 PM
Exit mobile version