Video : राखी झाली गंगुबाई; नेटिझन्सने केली आलियासोबत तुलना

Video : राखी झाली गंगुबाई; नेटिझन्सने केली आलियासोबत तुलना

कॉन्ट्रोवर्सी क्विन राखी सावंत काही दिवसांच्या गॅपने पुन्हा सोशल मीडियावर सक्रीय झाली आहे. टॉम क्रूझ माझ्याशी बोलतो असा खुलासा केल्यानंतर राखीवर आता आलिया भट्टच्या गंगूबाईचा फिव्हर चढल्याचे पाहायला मिळाले आहे. राखी सावंतने गंगूबाई काठियावाडी एडवान्स तिकीट काढून पाहिला होता. आता राखी थेट आलियाची मिमिक्री करताना दिसत आहे. राखीने आलियाचा सारखा लूक करत सिनेमातील डायलॉग रिक्रेएट केले आहेत. तर ढोलीडा गाण्यावर राखीने डान्स देखील केलाय.

राखीने केवळ गंगूबाई सारखा लूकच नाही तर तिच्यासारखे किलर एक्सप्रेशन्स देण्यातही राखी सफल झालीये. कपाळावर मोठी टिकली, हेव्ही मेकअप, केसात मोठा आंबोडा त्यात गुलाब, गळ्यात भरजरी ज्वेलरी, कॉटनची सिंपल साडी नेसून राखी ढोलिया गाण्यावर थिरकताना दिसत आहे. शेवटी राखीने आलियाची नमस्ते वाली सिग्नेचर स्टेप देखील केली आहे.

राखीचा हा व्हिडीओ तिच्या चाहत्यांच्या भलताच पंसतीस पडला आहे. व्हिडीओनंतर नेटिझन्सनी थेट राखीची तुलाना आलियासोबत केली आहे. आलियापेक्षा राखीला गंगूबाई चांगलीच जमलीय असे नेटिझन्सनी म्हटलेय. राखीच्या अभिनयाचं देखील सर्वांनी कौतुक केलं आहे. आलिया भट्ट पेक्षा तुम्ही चांगला अभिनय केलात , असे एका युझरने म्हटलेय, तर दुसऱ्या युझरने राखी सावंत इज ऑन फायर असे म्हणत राखीवर प्रेमाचा वर्षाव केलाय.

आलिया भट्टचा गंगूबाई काठियावाडी या सिनेमा २५ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला आला. सिनेमा फारशी कमाई करू शकलेला नाही परंतु सिनेमातील आलियाचे डायलॉग आणि गाणी चांगलीच प्रसिद्ध झालीत. आलियाच्या डायलॉगवर सोशल मीडियावर अनेकांनी रिक्रेएट केलेत.


हेही वाचा – राखी सावंत बऱ्याच दिवसांनी बरळली; म्हणे, Tom Cruise मला दर महिन्याला फोन करतो

First Published on: March 10, 2022 5:56 PM
Exit mobile version