आर्यनच्या जामिनानंतर राम गोपाल वर्मांची उपरोधिक पोस्ट म्हणाले…

आर्यनच्या जामिनानंतर राम गोपाल वर्मांची उपरोधिक पोस्ट म्हणाले…

आर्यनच्या जामिनानंतर राम गोपाल वर्मांची उपरोधिक पोस्ट म्हणाले...

बॉम्बे हायकोर्टाकडून अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणात जामीन दिल्यानंतर शाहरुखच्या चाहत्यांनी मन्नतबाहेर एकच जल्लोष केला. तर दुसरीकडे बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी ट्विट करत आर्यन खानच्या सुटकेवर आपली प्रतिक्रिया दिली.  मात्र निर्माते राम गोपाल वर्मा यांनी आर्यनच्या सुटकेनंतर एक उपरोधिक ट्विट केले आहे. ‘अशा प्रकरणात अनेक जणांना मुकूल रोहतगी यांच्यासारख्या वकिलांकडे केस देता येत नाही. त्यामुळेच अनेक वर्ष खटल्याविनाच अनेक निर्दोष तुरुंगात खितपत पडले आहेत’, असे ट्विट राम गोपाल वर्मा यांनी केले आहे. या ट्विटने सोशल मीडियावर सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

आर्यन खानच्या जामीनासाठी शाहरुख खानने दिग्गज वकिलांची फौज तैनात केली होती. प्रसिद्ध वकील अमित देसाई आणि सतीश मानेशिंदे यांच्यानंतर आर्यनच्या जामीनासाठी वकील मुकुल रोहतगी यांची एंट्री झाली. रोहतगी यांनी  भारताचे माजी अँटर्नी जनरल म्हणून काम केले आहे. मीडिया रिपोर्टनुसार वकील मुकुल रोहतगी एका सुनावणीसाठी जवळपास १० लाख रुपये फि घेतात. महाराष्ट्र सरकारने दिलेल्या एका RTIमध्ये रोहतगी यांना महाराष्ट्र सरकारकडून जस्टिस बीएच लोया केससाठी १.२१ करोड रुपये देण्यात आल्याचे म्हटले होते.

आर्यनच्या जामिनानंतर अभिनेता सोनू सोदूने ट्विट करत आर्यनच्या सुटकेविषयी त्याची प्रतिक्रिया दिली आहे.

मी एक वडील म्हणून मला फार वाईट वाटत आहे. देव सगळं चांगलं करेल आणि सगळ पॉझिटीव्ह होईल,असे म्हणत अभिनेता आर माधवन यांने ट्विट केले आहे.

 


हेही वाचा – Aryan Khan Bail: मन्नतच्या बाहेर शाहरुखच्या चाहत्यांचा जल्लोष, फटाके आणि पेढे वाटून साजरा केला आनंद

First Published on: October 28, 2021 9:07 PM
Exit mobile version