जागतिक विक्रम केल्यानंतर ‘रामायण’ पुन्हा एकदा ‘या’ चॅनेलवर प्रदर्शित होणार

जागतिक विक्रम केल्यानंतर ‘रामायण’ पुन्हा एकदा ‘या’ चॅनेलवर प्रदर्शित होणार

जागतिक विक्रम केल्यानंतर 'रामायण' पुन्हा एकदा 'या' चॅनेलवर प्रदर्शित होणार

रामानंद सागर दिग्दर्शित ‘रामायण’ ही मालिका १९८७ साली पहिल्यांदा नॅशनल चॅनलवर प्रदर्शित झाली होती. त्यावेळेस या पौराणिक मालिकेला खूप लोकप्रियता मिळाली होती. दरम्यान कोरोना विषाणूच्या लॉकडाऊनमुळे ही मालिका पुन्हा एकदा प्रदर्शित झाली. यावेळेस या मालिकेने जागतिक विक्रम केला आहे. ‘रामायणा’च्या या यशानंतर पुन्हा एकदा ही मालिका स्टार प्लसवर प्रदर्शित होणार आहे. या मालिकेत अभिनेते अरुण गोविल यांनी रामाची भूमिका तर अभिनेत्री दीपिका चिखलिया यांनी सीताची भूमिका केली आहे.

अभिनेत्री दीपिका चिखलिया यांनी ‘रामायण’ पुन्हा प्रदर्शित होण्याबाबत म्हणाल्या की, ‘माझ्या जीवनातील सर्वात अविस्मरणीय सीताची भूमिका आहे. मला फक्त भारतातच नाही तर परदेशात देखील प्रेक्षकांकडून खूप प्रेम आणि आपलुकी मिळाली आहे. आता पुन्हा एकदा स्टारप्लसवर मालिका प्रदर्शित होत असल्यामुळे प्रेक्षकांना पुन्हा महाकाव्य पौराणिक कथा पाहण्यास मिळेल.’

रामानंद सागर यांच्या ‘रामायण’ या मालिकेला ३३ वर्षांनंतर १६ एप्रिलला ७.७ कोटी लोकांनी ही मालिका पाहिल्याची नोंद झाली आहे. दूरदर्शनच्या ट्विटर अकाऊंटवरून माहिती देण्यात आली आहे. या विक्रमाची माहिती देताना डीडी इंडियाने आपल्या ट्विटमध्ये लिहिलं की, दूरदर्शनवरील ‘रामायण’ मालिकेने जागतिक विक्रम केला आहे. १६ एप्रिलला ७.७ कोटी लोकांनी ही मालिका पाहिल्यामुळे हा जागतिक विक्रम ठरला आहे.


हेही वाचा – स्वप्निल जोशीला रामायणात ‘कुश’ ची भुमिका ‘या’ व्यक्तीमुळे मिळाली?


 

First Published on: May 4, 2020 9:33 PM
Exit mobile version