घरताज्या घडामोडीस्वप्निल जोशीला रामायणात 'कुश' ची भुमिका 'या' व्यक्तीमुळे मिळाली?

स्वप्निल जोशीला रामायणात ‘कुश’ ची भुमिका ‘या’ व्यक्तीमुळे मिळाली?

Subscribe

नुकतेच उत्तर रामायण संपले. उत्तर रामायणातील राम आणि सीता यांचा मुलगा कुश ही भुमिका करणारा स्वप्नील जोशीने पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनात घर केलं. स्वप्निलने आपल्या करिअरची सुरूवात चाइल्ड आर्टिस्टच्या रूपात केली. तो अगदी लहान असताना रामानंद सागर यांच्या उत्तर रामायणात कुश ची भुमिका साकारली आणि स्वप्निल घराघरात पोहचला. पण तुम्हाला माहितेय का स्वप्निलला ही भुमिका कशी मिळाली?

- Advertisement -

स्वत: स्वप्नीलने या बद्दल सांगितले आहे, स्वप्नील म्हणाला की, मी गिरगावच्या लक्ष्मीबाई चाळीत रहात होतो. त्यावेळी चाळीतील गणेशोत्सवातील कार्यक्रमात त्याने भाग घेतला होता. नाटक आणि फॅन्सीड्रेस स्पर्धेत मी भाग घेतला होता. यावेळी श्रीकृष्ण मालिकेत कंसाची भुमिका करणारे विलास राज स्वप्नीलच्या बाजूला रहात होते. विलास राज यांनी रामायण मालिकेत लवणासुर नामक राक्षसाची भुमिका केली होती. त्यामुळे ते प्रसिध्द झाले होते.

- Advertisement -

विलास राज यांनी गणेशोत्सवातील नाटकातील स्वप्नीलच काम बघितलं आणि स्वप्निलच्या वडिलांकडे त्याचा फोटो मागितला. स्वप्निलच्या फोटोतील त्याच्या वाढदिवसाचा फोटो त्यांना आवडला. आणि त्याने तो फोटो घेतला. त्यानंतर विलास यांनी स्वप्निलच्या कामाचे खूप कौतुक केले.

विलास राज यांनी स्वप्निलचा फोटो घेऊन गेले आणि काही दिवसातच सागर आर्ट्स प्रोडक्शनमधून कॉल आला. त्यानंतर स्वप्निलची ऑडिशन झाली आणि स्वप्निलला कुशचा रोल मिळाला.


हे ही वाचा – रामायणातील रावणाच्या निधनाच्या अफवांना पुर्णविराम, स्वत: ट्वीट करत केला खुलासा!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -