Ranbir-Aliaच्या लग्नापूर्वी अयान मुखर्जीने Brahmastraचा ‘लव्ह पोस्टर’ केला प्रदर्शित

Ranbir-Aliaच्या लग्नापूर्वी अयान मुखर्जीने Brahmastraचा ‘लव्ह पोस्टर’ केला प्रदर्शित

Ranbir-Aliaच्या लग्नापूर्वी अयान मुखर्जीने Brahmastraचा 'लव्ह पोस्टर' केला प्रदर्शित

सध्या रणबीर कपूर आणि आलिया भट्टचे लग्न टॉक ऑफ द टाउन झाले आहे. रणबीर आलियाच्या लग्नापूर्वी दोघांचा चांगला मित्र आणि दिग्दर्शक अयान मुखर्जीने कपलच्या चाहत्यांना खास ट्रीट दिली आहे. अयान मुखर्जीने ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटातील रणबीर आणि आलियाचे इंटेंस लव्ह पोस्टर शेअर केला आहे.

‘ब्रह्मास्त्र’च्या नव्या पोस्टरमध्ये रणबीर आणि आलिया एकमेकांच्या प्रेमात बुडालेले दिसत आहे. चित्रपटाच्या पोस्टरमध्ये ज्याप्रकारे इंटेसिटीसोबत रणबीर आणि आलिया एकमेकांच्या प्रेमात दंग झाले आहेत, ते पाहून कोणाचेही मन खुश होईल. रणबीर आणि आलियाचे इंटेंस लव्ह पाहून चित्रपटातील दोघांची सिजलिंग केमिस्ट्री चाहत्यांचे मन जिंकेल हे जाहीर झाले आहे.

रणबीर आणि आलियाचा ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपट यंदा सप्टेंबर महिन्यात प्रदर्शित होणार आहे. ९ सप्टेंबर २०२२ रोजी ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटागृहात ५ वेगवेगळ्या भाषेत हिंदी, तमिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळममध्ये प्रदर्शित होणार आहे. चित्रपटात रणबीर-आलिया व्यतिरिक्त महानायक अमिताभ बच्चन, मोनी रॉयही प्रमुख भूमिकेत आहेत.


हेही वाचा – अनिल कपूरचा ‘थार’ चित्रपट ‘या’ दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीस


First Published on: April 10, 2022 4:00 PM
Exit mobile version