ज्याला पाहून ऋषि कपूरही झाले होते Confuse; रणबीरच्या ‘त्या’ डुप्लिकेटचे निधन

ज्याला पाहून ऋषि कपूरही झाले होते Confuse; रणबीरच्या ‘त्या’ डुप्लिकेटचे निधन

बॉलीवूड अभिनेता रणबीर कपूरसारखा (ranbir kapoor) हुबेहूब दिसणाऱ्या २८ वर्षिय जुनैद शहाचे (junaid shah) निधन झाले आहे. काश्मीरमध्ये राहणाऱ्या जुनैदच्या निधनाची माहिती येथील एका पत्रकाराने सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे. जुनैद शहाचे निधन हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे त्यांनी म्हटले आहे. चित्रपटातील अनेक कलाकारांचे डुप्लिकेट (duplicate) पाहायला मिळतात. त्यातच रणबीर कपूरसारखा दिसणारा जुनैद यालाही चांगलीच प्रसिद्धी मिळाली होती.

सोशल मीडियावर जुनैदचे भरपूर फॉलोअर्स होते. इंस्टाग्रामवर जुनैदने त्याने खुप सारे फोटो शेअर केले होते. या फोटोंमध्ये जुनैद वेगवेगळ्या पोजमध्ये दिसत आहे. त्याचा चेहरा अभिनेता रणबीर कपूरशी मिळताजुळता असल्याने जुनैद अनेकदा चर्चेत राहिला आहे. जुनैदला हृदयाचा विकार होता. महिनाभरापूर्वीच तो त्याच्या आई – वडिलांसोबत मुंबईहून घरी परतले होते. जुनैद मुंबईत मॉडेलिंग करत होते. त्यांनी अनुपम खेर यांच्या मॉडेलिंग स्कूलमध्ये प्रवेश घेतला होता.

 

दिवंगत अभिनेता ऋषि कपूर हेदेखील जुनैदला पाहून चकित झाले होते. त्यांनी रणबीर आणि जुनैदचा फोटो काही वर्षांपूर्वी ट्विटरवर शेअर करत आश्चर्य व्यक्त केले होते. दिवंगत अभिनेता ऋषि कपूर हेदेखील जुनैदला पाहून चकित झाले होते. त्यांनी रणबीर आणि जुनैदचा फोटो काही वर्षांपूर्वी ट्विटरवर शेअर करत आश्चर्य व्यक्त केले होते. ऋषि कपूर यांनी पोस्टमध्ये कमेंट केली होती की, ‘ओह माय गॉड. माझ्या मुलाचा डुप्लिकेट. मलासुद्धा असली – नकलीमध्ये फरक ओळखता येत नाईए.’

हेही वाचा –

तिरुपती बालाजी मंदिरातील १४० कर्मचाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग, तरिही दर्शन सुरूच

First Published on: July 17, 2020 7:14 PM
Exit mobile version