Video: ‘त्या’ वादानंतरही रानूने पुन्हा गायलं लता मंगेशकरांचं गाणं

Video: ‘त्या’ वादानंतरही रानूने पुन्हा गायलं लता मंगेशकरांचं गाणं

सोशल मीडियावर रातोरात अनेकजण स्टार झाले आहेत. बंगालमधील स्टेशनवर ‘प्यार का नगमा है’ गाणं गाणाऱ्या रानूचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हायरल झालेल्या व्हिडीओ नंतर सगळ्यांनी रानूची तुलना थेट लता मंगेशकरबरोबर केली होती. त्यानंतर संगीतकार हिमेश रेशमियाने रानूला आपल्या चित्रपटात गाण्याची संधी दिली. पण लता मंगेशकरांची उपमा मिळालेल्या रानूवर लता मंगेशकर नाराज होत्या. याच रानूला गानकोकिळा लता मंगेशकर यांनी एक सल्ला दिला होता. ”माझी कॉपीकरून, नक्कल करून फार काळ यश मिळत नाही.” यावंर रानूने लता मंगेशकरांना ”मी कोणाच्याही आवाजाची नक्कल करत नाही. मी माझ्याच आवाजत गाणे गायले आहे.” , असे सडेतोड उत्तर देखील दिले होते. ‘त्या’ वादानंतर पुन्हा रानूने लता मंगेशकरांचे ‘सत्यम शिवम सुंदरम’ हे गाणं गायलं आहे.

‘लता मंगेशकरांनी गायिकांचे करियर उध्दवस्त केले’; नेटकरी संतापले!

‘तेरी मेरी कहानी’ हे गाणं गायल्यानंतर बॉलिवूडनध्ये पदार्पण करणाऱ्या रानूचे पुन्हा एक गाणं सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये सोशल मीडिया सेन्सेशन लता मंगेशकर यांचेच ‘सत्यम शिवम सुंदरम’ गाणं गाताना दिसली आहे. या व्हिडिओमध्ये रानू आपल्या गाण्याचे लाईव्ह सादरीकरण करताना दिसतेय.

हे गाणं बंगाली टेलिव्हिजन शो ‘कॉमेडी स्टार्स’ या कार्यक्रमात पोहोचली होती. यावेळी रानूने पुन्हा एकदा लता मंगेशकरांचेच गाणं गायल्याचे समोर आले आहे. रानूने गायलेलं गाणं ऐकून उपस्थित प्रेक्षकांचे मन जिंकून घेतले आहे. यावेळी रानूचा मधूर आवाज ऐकून सगळे भारावून गेले, त्यानंतर सगळ्यांनीच रानू मंडलच्या आवाजाचे कौतुक केले आहे.


राणू मंडलाचे लता मंगेशकरांना सडेतोड उत्तर
First Published on: October 30, 2019 2:02 PM
Exit mobile version