रणवीरने लावले दीपिका समोर ठुमके, व्हायरल व्हिडिओवर चाहते झाले फिदा

रणवीरने लावले दीपिका समोर ठुमके, व्हायरल व्हिडिओवर चाहते झाले फिदा

रणवीरने लावले दीपिका समोर ठूमके, व्हायरल व्हिडिओवर चाहते झाले फिदा

बॉलिवूड क्षेत्रातील अनेक सेलिब्रिटी कोणत्या न् कोणत्या कारणाने चर्चेचा विषय ठरत असतात. तसेच सोशल मीडियाचा जमाना असल्यामुळे कलाकारांच्या प्रत्येक अपटेड चाहत्यांपर्यंत  आपोआप पोहोचतात. इतकंच नाही तर अनेक फॅन पेजेस देखील कलाकारांच्या नावाने तयार क‌ेले जातात. अशातच बॉलिवूडमधील सर्वात पॉप्युलर कपल दीपिका पादुकोन (deepika padukone) आणि रणवीर सिंह (ranveer singh)यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. दोघांच प्रेम, मजा मस्ती पाहून पती-पत्नी असावे तर असे असं वाटल्याशिवाय राहणार नाही. गेली अनेक वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर रणवीर आणि दीपिकाने लग्न करण्याचा निर्णय घेतला. रणवीर आपल्या पत्नीला स्पेशल फिल करण्याची कोणतीही संधी सोडत नाही. नुकतच रणवीरच्या आईच्या बर्थडे सेलिब्रेशनच्या दिवशी रणवीर आणि दीपिकाचा एक व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये रणवीरचा मजेशीर अंदाज दिसत आहे.(ranveer singh dances in front of wife deepika padukone)

पिंकविलाने त्यांच्या अधीकृत सोशल मीडिया अकांऊटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. आणि या व्हिडिओमध्ये रणवीर-दीपिका धम्माल करताना दिसत आहे. रणवीर- दीपिका समोर अतरंगी स्टाईलमध्ये डांस करताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये दीपिका एका सोफ्यावर आरामशीर बसलेली दिसत आहे. तर रणवीर तिच्यासमोर शर्टलेस होऊन आणि डोक्यावर एक हॅट घालून डांस करत आहे. या व्हिडओमध्ये रणवीर दीपिकाला मनवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. तर दीपिकासुद्धा रणवीरच्या डांसची मज्जा लुटत आहे. सध्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांनी या व्हिडिओला संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत.

व्हिडिओ पाहा- 

बॉलिवूडचा सिंबा रणवीर सिंह आणि दिपिकाच्या ६ वर्षापासून असणाऱ्या रिलेशनशिपच्या नंतर मागच्या वर्षी दोघे लग्न बंधनात अडकले. रणवीर आणि दीपिकाचे इटलीमध्ये धुमधडाक्यात विवाह पार पडला होता.


हे हि वाचा – रश्मिका मंदाना- सिद्धार्थ मल्होत्रा अभिनीत ‘मिशन मजनू’ सिनेमाचं शूटींग सुरू

First Published on: August 24, 2021 12:31 PM
Exit mobile version