घरमनोरंजनरश्मिका मंदाना- सिद्धार्थ मल्होत्रा अभिनीत 'मिशन मजनू' सिनेमाचं शूटींग सुरू

रश्मिका मंदाना- सिद्धार्थ मल्होत्रा अभिनीत ‘मिशन मजनू’ सिनेमाचं शूटींग सुरू

Subscribe

रश्मिका मंदाना 'मिशन मजनू' या सिनेमामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.

बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा (sidharth malhotra) सध्या सातवे आसमान पर आहे असं म्हणायला हरकत नाही. नुकतच सिद्धार्थचा ‘शेरशाह’ (shershaah) हा सिनेमा रिलीज झाला. कारगिल युद्धावर आधारित या सिनेमात सिद्धार्थने कॅप्टन विक्रम बत्रा यांची भूमिका उत्तमरित्या निभावली आहे. आता पुन्हा एकदा सिद्धार्थ त्याच्या आगामी सिनेमाच्या शूटींगमध्ये व्यस्त झाला आहे. दाक्षिणात्य फेम अभिनेत्री रश्मिका मंदाना (rashmika mandanna) सोबत ‘मिशन मजनू’ (mission majnu) या बहुप्रतिक्षीत सिनेमात सिद्धार्थ झळकणार आहे. काही दिवसांचा ब्रेक घेतल्यानंतर सिद्धार्थने ‘मिशन मजनू’ सिनेमाच्या दूसऱ्या शूटींग शेड्यूलला सुरूवात केली आहे. पुढील 15 दिवस शूटिंग शेड्यूल मुंबईतील वेगवेगळ्या लोकेशनवर शूट होणार आहे अशी माहिती समोर आली आहे. तसेच यापूर्वी गेले 45 दिवस सिद्धार्थ लखनऊमध्ये चित्रपटाच्या शूटींगमध्ये व्यस्त होता.(sidharth malhotra and rashmika mandanna resumes shooting of mission majnu)

 

View this post on Instagram

 

A post shared by Sidharth Malhotra (@sidmalhotra)

- Advertisement -

रश्मिका मंदाना ‘मिशन मजनू’ या सिनेमामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. सिनेमाबाबत सांगायचे झाल्यास मिशन मजनू हेरगिरी वरील 1970 सालच्या सत्य घटनेवर आधारीत आहे. तसेच एक थ्रिरल सिनेमा असणार आहे. अभिनेता सिद्धार्थ सिनेमात रॉ एजंटची भूमिका साकारणार आहे. तर फिल्ममेकर शांतनु बागची यांनी सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे.

सध्या सिद्धार्थच्या ‘शेरशाह’ चित्रपटाची चांगलीच चर्चा सुरू आहे. या चित्रपटाने अक्षरशः प्रेक्षकांच्या डोळ्यात पाणी आणले आहे. आता ‘शेरशाह’ वर्षातील ब्लॉकबस्टर चित्रपट असल्याचे म्हटले जात आहे. आता आगामी सिनेमात सिद्धार्थ त्याच्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जींकू शकेल की नाही हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

- Advertisement -

हे हि वाचा – फक्त 1 कोटी?.. 1 कोटी रुपयांची मदत मागणाऱ्या नेटकऱ्याला सोनूने दिले मजेशीर उत्तर

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -